Johnny Depp to play Ebenezer Scrooge new trailer for ‘Ebenezer: A Christmas Carol’ released : ख्रिसमसच्या लोकप्रिय आणि अजरामर कथेला आता अधिक गडद आणि भयावह रूप मिळणार आहे. Paramount Picturesने ‘एबेनेझर’ या चित्रपटाचा अधिकृत नवा ट्रेलर प्रदर्शित केला असून, हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप यामध्ये प्रसिद्ध पात्र एबेनेझर स्क्रूजच्या भूमिकेत दिसणार आहे. चार्ल्स डिकन्स यांच्या गाजलेल्या कथेवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांसमोर स्क्रूजची यापूर्वी कधीही न पाहिलेली बाजू घेऊन येणार आहे.
शाळेच्या सहलीची धमालमस्ती 9 ऑक्टोबरला मोठ्या पडद्यावर “सहल” चित्रपटाचा ट्रेलर लाँच
ट्रेलरमध्ये एबेनेझर स्क्रूजचं जग पाहायला मिळतं. अत्यंत कंजूष आणि कटू स्वभावाच्या स्क्रूजच्या आयुष्यात ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला एक अनपेक्षित घटना घडते आणि त्याची गाठ काही अलौकिक शक्तींशी पडते. त्यानंतर त्याला आपल्या भूतकाळातील घटना, वर्तमानातील वास्तव आणि भविष्यातील शक्यता यांची भयावह झलक दिसू लागते.
अभिनेता डिनो मोरियाला मुंबई पोलिसांकडून अटक; ठाकरेंच्या काळातील मिठी नदी गैरव्यवहाराप्रकरणी कारवाई
या अनुभवातून स्क्रूजला आपल्या आयुष्यात घेतलेल्या निर्णयांचा आणि स्वतःच्या बदललेल्या व्यक्तिमत्त्वाचा सामना करावा लागतो. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना थरार आणि भीतीचा अनुभव देण्यासोबतच चार्ल्स डिकन्स यांच्या अजरामर कथेचा एक वेगळा आणि अधिक गडद अंदाज सादरणार आहे. या चित्रपटात जॉनी डेपसोबत रुपर्ट ग्रिंट, अँड्रिया रायसबरो, सॅम क्लॅफ्लिन, डेझी रिडली, आर्थर कॉन्टी, एली बॅम्बर, हेन्री लॉयड-ह्यूजेस, चार्ली मर्फी, ट्रॅमेल टिलमन आणि इयान मॅकेलन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
वनडे विश्वचषक 2027 चा नवा फॉरमॅट जाहीर, सुपर सिरीज आणि सुपर 7 मुळे वाढणार थरार
टी वेस्ट यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. जॉनी डेपसोबत अँड्रिया रायसबरो, सॅम क्लॅफ्लिन, डेझी रिडली, आर्थर कॉन्टी, एली बॅम्बर, हेन्री लॉयड-ह्यूजेस, चार्ली मर्फी, ट्रॅमेल टिलमन आणि इयान मॅकेलन हे कलाकार झळकणार आहेत. चित्रपटाची पटकथा नाथॅनियल हॅल्पर्न यांनी लिहिली असून, ती चार्ल्स डिकन्स यांच्या प्रसिद्ध ‘A Christmas Carol’ या कादंबरीवर आधारित आहे. Paramount Pictures निर्मित ‘Ebenezer: A Christmas Carol’ हा चित्रपट 27 नोव्हेंबर 2026 रोजी भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
