Download App

Maharaj Movie: जुनैद खानच्या पहिल्या चित्रपटाची ओटीटीवर जादू; 22 देशांमध्ये सिनेमा टॉप ट्रेंडिंगला

Maharaj Movie: मल्होत्रा ​​पी. सिद्धार्थ दिग्दर्शित 'महाराज' चित्रपटातून पदार्पण केले. हा चित्रपट 14 जून 2024 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म प्रसारित झाला.

Junaid Khan Debut Film Maharaj Trending On Top: आमिर खानचा (Aamir Khan) लेक जुनैद खान (Junaid Khan ) ज्याला बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जाते आणि त्याची पहिली माजी पत्नी रीना दत्ता, गेल्या महिन्यातच चित्रपट दिग्दर्शक मल्होत्रा ​​पी. सिद्धार्थ दिग्दर्शित ‘महाराज’ (Maharaj Movie) चित्रपटातून पदार्पण केले. (Junaid Khan Debut ) हा चित्रपट 14 जून 2024 रोजी ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म नेटाफिलिक्सवर प्रसारित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले.


या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार जुनैद खानचा हा डेब्यू चित्रपट ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याचा चित्रपट 22 देशांमध्ये टॉप ट्रेडमध्ये आहे. जुनैदचा हा चित्रपट सध्या भारतात ओटीटीवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे, तर इतर 22 देशांमध्ये तो टॉप 10 मध्ये आपले स्थान कायम राखत आहे.

जुनैद खानच्या डेब्यू चित्रपटाने खळबळ

या चित्रपटात जुनैद करसनदास मुळजीच्या भूमिकेत दिसत आहे. याशिवाय जयदीप अहलावत, शालिनी पांडे आणि शर्वरी देखील चित्रपटात दिसत आहेत. या चित्रपटात जयदीप अहलावत जदुनाथ महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. शालिनी पांडेही किशोरच्या भूमिकेत तर शर्वरी वाघ या चित्रपटात विराज नावाच्या मुलीच्या भूमिकेत दिसत आहे. एका सामाजिक संदेशाद्वारे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या चित्रपटाची कथाही खूप पसंत केली जात आहे.

Maharaj ओटीटीवर प्रदर्शित होत असताना दिग्दर्शक सिद्धार्थ पी मल्होत्रा ​​यांनी लिहिली भावनिक पोस्ट; म्हणाले

भारतात नंबर 1 आणि इतर देशांमध्ये ट्रेंडिंग

जुनैद खान आणि जयदीप अहलावत यांचा हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर इतर 22 देशांमध्येही चर्चेत आहे, याविषयीची माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ पी मल्होत्रा ​​यांनी स्वत: त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून दिली आहे. पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले की, ‘माझा चित्रपट ‘महाराज’ भारतात पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे, तर इतर 22 देशांमध्ये टॉप 10 च्या यादीत आहे. यासाठी संपूर्ण प्रतिभावंत टीमचे आभार आणि ‘महाराज’ला संधी दिल्याबद्दल प्रेक्षकांचेही आभार मानले आहे.

follow us

वेब स्टोरीज