Download App

Junior Mehmood : प्रसिद्ध अभिनेते ज्युनियर मेहमूद कालवश; 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Junior Mehmood Passed Away : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते ज्युनियर मेहमूद (Junior Mehmood) यांचं कर्करोगाने निधन झाले. अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती खालावल्याच्या बातम्याही आल्या होत्या. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी मेहमूद 67 वर्षांचे होते. मेहमूद यांना पोटाचा कॅन्सर होता. हा कॅन्सर चौथ्या स्टेजला आला होता. मेहमूद यांनी अनेक हिंदी चित्रपटात काम केले. हाथी मेरे साथी, कारवां आणि मेरा नाम जोकर या चित्रपटात त्यांनी त्यांच्या अभिनयाचे कसब दाखवले. या व्यतिरिक्त त्यांनी अनेक चित्रपटात काम केले होते. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

अभिनेते सचिन पिळगावकर आणि जितेंद्र यांच्यासह ज्युनियर मेहमूद यांनी अनेक चित्रपटात काम केले. सचिन आणि मेहमूद दोघे बालपणीचे मित्र होते. काही दिवसांपूर्वी सचिन यांनी त्यांची भेटही घेतली होती. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. ज्युनियर मेहमूद यांचे मित्र सलाम काजी यांनीही त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. उपचारादरम्यान त्यांनी त्यांचे मित्र अभिनेते जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. या दोघांनीही मेहमूद यांची भेट घेतली. सचिन ज्यावेळी त्यांना भेटले त्यावेळी त्यांनी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र मेहमूद यांनी कोणत्याही प्रकारची मदत घेण्यास नकार दिला होता.

कॅन्सरशी लढणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्याचा चेहराही ओळखू येईना! जितेंद्र अन् सचिन पिळगावकर पोहोचले भेटीला

पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी चित्रपटात काम केले. रिपोर्ट्सनुसार त्यांचं खरं नाव नईम सय्यद होतं. पण, हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांना ज्युनियर मेहमूद याच नावाने ओळखलं जात होतं. दिग्गज अभिनेते महमूद यांनीच त्यांना हे नाव दिलं होतं. ज्युनियर मेहमूद यांना पोटाचा कॅन्सर असल्याचे एक महिना आधीच कळाले होते. मात्र त्यावेळी खूप उशीर झाला होता. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. त्यानंतर मात्र काही दिवसांतच त्यांचे निधन झाले.

चित्रपटातील कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केलं. 1967 मध्ये त्यांनी करिअरची सुरुवात केली होती. संजीव कुमार यांच्या नौनिहाल या चित्रपटात पहिल्यांदा काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यावेळी ज्युनियर मेहमूद फक्त 11 वर्षांचे होते. यानंतर त्यांनी संघर्ष, ब्रह्मचारी, दो रास्ते, कटी पतंग, हाथी मेरे साथी, हंगामा, छोटी बहू, दादागिरी यांसह अनेक चित्रपटात काम केले. राजेश खन्ना आणि गोविंदा यांच्या चित्रपटात ज्युनियर मेहमूद जास्त दिसले.

Kon Honar Karodpati: सचिन पिळगावकरांनी ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांना देखील टाकलं मागे

Tags

follow us