मुंबई : अभिनेता कैलास वाघमारे याचा आगामी ‘गाभ’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनय आणि लिखाण या माध्यमातून अभिनेता कैलास वाघमारे यांनी आजवर वेगवेगळ्या प्रवाहातील गोष्टी आपल्यासमोर मांडल्या आहेत. या चित्रपटातील कैलासची भूमिका आणि विषय संवेदशील असला तरी त्याचा रोमँटिक अंदाजही प्रेक्षकांना दिसणार आहे.
ही कथा एका मानसिकतेचं प्रतिनिधित्व करणारी भूमिका कैलास आपल्या ‘दादू’ या पात्रातून साकारणार आहे. आपल्या माजाला आलेल्या म्हशीसाठी रेडा शोधताना नायकामध्ये माणूस म्हणून होणारा बदल आणि त्या बदलाची कथा, अधोरेखित करणारा गावाकडच्या रांगड्या मातीतला
Video : नुसती धम्माल ! ‘मारो ठुमका’ गाण्यावर श्रद्धाने केला वडिलांसोबत भन्नाट डान्स
‘गाभ’ हा चित्रपट आहे. टाईम लॅप्स प्रोडक्शन आणि एजे मल्टिमीडिया प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘गाभ’ चित्रपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांचे आहे. सुमन नारायण गोटुरे आणि मंगेश नारायण गोटुरे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते अनुप जत्राटकर आहेत.या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा दिमाखात संपन्न झाला. यावेळी चित्रपटातील कलाकार तंत्रज्ञ उपस्थित होते.
‘गाभ’ चित्रपटात कैलास वाघमारे, विकास पाटील, सायली बांदकर, उमेश बोळके, वसुंधरा पोखरणकर, श्रद्धा पवार, चंद्रशेखर जनवाडे यांच्या भूमिका आहेत. छायाचित्रण वीरधवल पाटील यांचे तर संकलन रविंद्र चांदेकर यांचे आहे. गीते आणि संगीत, आणि साउंड डिझाइनची चंद्रशेखर जनवाडे तर जबाबदारी पार्श्वसंगीताची रविंद्र चांदेकर यांनी सांभाळली आहे.
आनंद शिंदे, प्रसन्नजीत कोसंबी, सावनी रविंद्र यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. रंगभूषा विजय ढेरे, वेशभूषा चैताली गाणू, केशभूषा रामेश्वरी, मोहिनी चव्हाण यांची आहे. व्हीएफक्स माधव चांदेकर तर कलादिग्दर्शनाची जबाबदारी सुंदर कुमार यांनी सांभाळली आहे. लाईन प्रोड्युसर चंद्रशेखर जनवाडे तर प्रोडक्शन मॅनेजर रंगराव पाटील आहेत.