Download App

प्रसिद्ध गायक Kailash Kher यांच्यावर हल्ला; अशी घडली घटना

कर्नाटक : कर्नाटक येथील हम्पी उत्सवादरम्यान प्रसिद्ध गायक कैलाश खेर (kailash kher ) यांच्यावर हल्ला झाला. कैलाश खेर यांचं लाईव्ह कॉन्सर्ट सुरु असताना एका व्यक्तीने गायकाला (singer ) पाण्याची बाटली फेकून मारली. यामुळे कार्यक्रमात एकच खळबळ माजली. ही घटना रविवारी घडली. प्रेक्षक गॅलरीमधूल कैलाश खेर यांच्यावर हल्ला करण्यात आहे. कैलाश खेर यांच्यावर हल्ला केल्यानंतर तात्काळ पोलिसांनी (Police ) हल्ला करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. कर्नाटकमध्ये (karnataka) घडलेल्या या प्रकरणामुळे कैलाश खेर यांचे चाहते संतापले आहेत.

बॉलिवूड आणि कन्नड सिनेक्षेत्रातील अनेक बड्या कलाकारांनी या कार्यक्रमात परफॉर्म केले. यात जागतिक वारसा असलेल्या स्थळाचे वैभव दाखविण्यासाठी साऊंड अँड लाईट शोचे आयोजन करण्यात आले. कन्नड गायक अर्जुन, जन्या, विजय प्रकाश, रघु दीक्षित आणि अनन्या भट यांनी कार्यक्रमात विशेष परफॉर्मन्स केला. शिवाय बॉलिवूडमधून अरमान मलिक आणि कैलाश खेर या गायकांनी लोकांचं मनोरंजन केलं.

३ दिवस चाललेला हम्पी महोत्सव २७ जानेवारीपासून सुरू झाला. विजयनगर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर प्रथमच तेथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते झाले. दरम्यान, कर्नाटकातील हम्पी महोत्सवात सहभागी होण्याअगोदर, कैलाश खेर यांनी लखनऊमध्ये उत्तर प्रदेश दिवसाच्या दिवशीही सादरीकरण केले. यावेळी त्यांनी अनेक सुफी गाणी गायली आहेत.

Tags

follow us