Download App

Kajol: ट्रोल झाल्यानंतर काजोलने एका वाक्यातच दिले स्पष्टीकरण; म्हणाली, ‘राजकीय नेत्याला कमी…’

Kajol: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री काजोल (Kajol) ही गेल्या काही दिवसांपासून कायम सिनेमामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्या ‘लस्ट स्टोरीज-2’ हा सिनेमा ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यापासून ती कायम चर्चेत येत आहेत. (Controversial Statement) आता लवकरच तिची द ट्रायल ही सीरिज चाहत्यांच्या  भेटीला येणार आहे. (Political Leaders) सध्या काजोल या वेब सीरिजचं प्रमोशन करत असल्याचे देखील दिसून येत आहे.

काजोल ही सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे नाही तर तिच्या खळबळजनक वक्तव्यामुळे चर्चेत येत आहे. एका मुलाखतीच्या दरम्यान काजोलने राजकीय नेत्यांबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलं होतं. तिच्या या वक्तव्याला अनेकांनी ट्रोल केल्यानंतर तिने आता यावर स्पष्टीकरण दिले आहे.

नेमकं काजल काय म्हणाली?

काजोल म्हणाली होती, ‘आपल्याकडे असे राजकीय नेते आहेत. ज्यांना शैक्षणिक पार्श्वभूमी आजिबात नाही.’ काजोलच्या या खळबळजनक वक्तव्यामुळे अनेकांनी तिला चांगलंच धारेवर धरलं होत. आता काजोलने एका ट्वीटच्या माध्यमातून या वक्तव्यावर सडेतोड स्पष्टीकरण दिले आहे. काजोलनं ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘मी फक्त शिक्षण आणि त्याचे महत्त्व याविषयी एक मुद्दा मांडत होते. माझा हेतू कोणत्याही राजकीय नेत्याला बदनाम करण्याचा आजोबाच्या नव्हता, आपल्याकडे काही महान नेते आहेत, जे देशाला योग्य मार्गावर नेत आहेत.’ काजोलनं हे ट्वीट करुन तिच्या वक्तव्यावर सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

गेल्या काही दिवसांपूर्वी काजोलचा ‘सलाम वेंकी’ हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला होता. या सिनेमाचं अनेकांनी मोठ्या प्रमाणात कौतुक केले आहे. तिचा लस्ट स्टोरी-2 हा सिनेमा देखील ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. काजोलबरोबर या सिनेमात तमन्ना भाटिया , विजय वर्मा, तिलोतमा शोम, अमृता शुभाश, अंगद बेदी, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकूर आणि नीना गुप्ता या देखील प्रमुख भूमिका साकारल्याचे दिसून आले आहे.

Tags

follow us