Kajol: काजोलचा ‘द ट्रायल’मधील खुल्लमखुल्ला ‘लिप लॉक’ सीन व्हायरल; नेटकरी म्हणे…

Kajol : अभिनेत्री काजोलने आजवर बॉलिवूड (Bollywood) सिनेमामध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. नुकतीच तिची ‘द ट्रायल’ (The trial) ही वेब सीरिज (Web series) चाहत्यांच्या  भेटीला आली आहे. या सीरिजमध्ये ती वकिलाच्या (lawyer) भूमिकेत दिसून आली आहे, परंतु त्यातील एक सीनने चाहत्यांचे तिने चांगलेच लक्ष वेधलं आहे. काजोलच्या लिपलॉकचा हा सीन (liplock scene) आहे. इंटिमेट सीनमुळे […]

Kajol

Kajol

Kajol : अभिनेत्री काजोलने आजवर बॉलिवूड (Bollywood) सिनेमामध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. नुकतीच तिची ‘द ट्रायल’ (The trial) ही वेब सीरिज (Web series) चाहत्यांच्या  भेटीला आली आहे. या सीरिजमध्ये ती वकिलाच्या (lawyer) भूमिकेत दिसून आली आहे, परंतु त्यातील एक सीनने चाहत्यांचे तिने चांगलेच लक्ष वेधलं आहे. काजोलच्या लिपलॉकचा हा सीन (liplock scene) आहे. इंटिमेट सीनमुळे काजोल जोरदार चर्चेत आली आहे.

‘द ट्रायल’ या सीरिजच्या अगोदर ती नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील ‘लस्ट स्टोरीज 2’ (Lust Stories 2) या अँथॉलॉजी सिनेमात एन्ट्री केली आहे. यामध्ये देखील तिचे काही बोल्ड सीन्स बघायला मिळत आहे. काजोलचा हा बोल्ड अंदाज बघून चाहते थक्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या नेहमीच्या प्रतिमेपेक्षा अत्यंत वेगळ्या भूमिका साकारण्यास ती प्राधान्य देत असल्याचे बघायला मिळत आहे. सोशल मीडियावनर व्हायरल होणारा काजोलचा हा इंटिमेट सीन ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमधील आहे. ट्विट आणि इन्स्टाग्रामवर सध्या हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे.

यामध्ये काजोल दोन वेगवेगळ्या अभिनेत्यांना किस करत असताना दिसत आहे. यावर चाहत्यांकडून अनेक भन्नाट प्रतिक्रिया येत असल्याचे दिसत आहे. एका सीनमध्ये काजोल अभिनेता एली खानबरोबर लिपलॉक करत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसऱ्या सीनमध्ये तिच्याबरोबर जीशु सेन गुप्ता आहे. या शोमध्ये काजोल आणि जीशु यांनी पती-पत्नीची भूमिका साकारली आहे. ‘द ट्रायल’ या सीरिजमध्ये काजोलने नोयोनिका नावाच्या वकिलाची भूमिका साकारल्याचे सांगितले जात  आहे. या सीरिजमध्ये काजोलच्या पतीला सेक्स स्कँडल आणि लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात येते. यामुळे कुटुंबासाठी ती वकिलाची नोकरी करू लागते.

लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरेंचा कॅन्सरशी लढा; लग्नाच्या 25 व्या वाढदिवसादिवशी समजली बातमी

यामध्ये अभिनेता एली खानने विशाल चौबेची भूमिका साकारली असल्याचे दिसत आहे. नोयोनिका आणि विशाल हे अगोदर एकमेकांच्या प्रेमात होते. बऱ्याच वर्षांनंतर जेव्हा या दोघांची भेट होते, तेव्हा त्यांच्यातील जवळीक वाढल्याचे दिसून आले आहे. या सीरिजमध्ये नोयोनिकाच्या कथेच खूपच ट्विस्ट असल्याचे सांगण्यात येत आहेत. अखेर कथेच्या एका वळणावर विशाल आणि नोयोनिका हे एकमेकांना किस करत असताना दिसून येत आहेत. हा सीन सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असल्याचे दिसत आहे.

‘द ट्रायल’ ही वेब सीरिज १४ जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘द गुड वाइफ’ या अमेरिकन शोवर आधारित या सीरिजची कथा असल्याचे सांगितले जात आहे. २००९ मध्ये हा वेब शो प्रदर्शित करण्यात आला होता. या शोचे ७ सिझन चाहत्यांच्या भेटीला आले होते. एलिसिया फ्लोरिक नावाच्या एका महिलेची कथा यामध्ये दिसून आली आहे. तिचा पती राजकीय क्षेत्रात असून सेक्स स्कँडलमध्ये तो अडकल्याचे दिसून आला आहे.

Exit mobile version