Download App

अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच ‘कल्की 2898 एडी’ची हवा टाइट; रिलीजपूर्वी भारतात 6 कोटीची केली कमाई

Kalki 2898 AD Advance Booking: चाहते प्रभासच्या (Prabhas) 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Kalki 2898 AD Advance Booking: चाहते प्रभासच्या (Prabhas) ‘कल्की 2898 एडी’ (Kalki 2898 AD) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 27 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत असून लोकांमध्ये त्याची क्रेझ आतापासूनच दिसून येत आहे. चित्रपटाबद्दल लोकांमध्ये चर्चा कायम ठेवण्यासाठी, निर्माते दररोज काही अपडेट शेअर करत असतात. ज्यामुळे लोकांमध्ये चर्चा निर्माण झाली आहे. चित्रपटाची आगाऊ बुकिंग फार पूर्वी परदेशात सुरू झाली होती पण आता भारतातही सुरू झाली आहे.


ॲडव्हान्स बुकिंग काल दक्षिणेत सुरू झाले होते आणि आता उत्तर भारतात देखील हिंदी आवृत्तीसाठी मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. नाग अश्निन दिग्दर्शित ‘कल्की 2898 एडी’मध्ये प्रभाससोबत दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, दिशा पटानी आणि कमल हसन हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये चाहत्यांनी प्रत्येकाचा लूक पाहिला आहे आणि तो खूप पसंत केला जात आहे. चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगने साऊथमध्ये रेकॉर्ड तोडले आहेत.

बुकिंग साइट क्रॅश

बॉलीवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, अनेक चाहते सोशल मीडियावर तक्रार करत आहेत की जेव्हा ते दक्षिणेत तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा साइट क्रॅश झाली. हे पाहता हा चित्रपट अनेक विक्रम मोडणार आहे असे म्हणता येईल. रिपोर्ट्सनुसार, हैदराबादसारख्या शहरात प्रचंड ॲडव्हान्स बुकिंग दिसून आले आहे. या चित्रपटाचे पहाटेचे शो देखील फुल्ल होतील अशी अपेक्षा आहे. हा चित्रपट 600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचे उत्तम कलेक्शन होण्याची अपेक्षा आहे.

Kalki 2898 AD: प्रभास- दिलजीतच्या ‘कल्की 2898 एडी’ चे पहिले धमाकेदार गाणे रसिकांच्या भेटीला

‘कल्की 2898 एडी’ हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे जो तमिळ, हिंदी आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट IMAX, 3D आणि अनेक फॉरमॅटमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा एक साय-फाय चित्रपट असून त्यात प्रभास भैरव आणि अमिताभ बच्चन अश्वत्थामाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

follow us

वेब स्टोरीज