Maharashtrachi Hasyajatra : कमाल गायलंस मित्रा, सत्यजित तांबेंकडून ओंकार भोजनेचं कौतुक !

जळगाव : जळगावमध्ये फैजपूर याठिकाणी एका कार्यक्रमात महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता आणि विनोदवीर ओंकार भोजने याने कविता म्हटली. या कार्यक्रमाला आमदार सत्यजित तांबे देखील उपस्थित होते. ओंकार भोजनेची कविता ऐकल्यानंतर त्याची ही कवितेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट करण्याचा मोह सत्यजित तांबे यांनाही आवरला नाही. View this post on Instagram A post shared by Satyajeet Tambe […]

Onkar Bhojane

Onkar Bhojane

जळगाव : जळगावमध्ये फैजपूर याठिकाणी एका कार्यक्रमात महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता आणि विनोदवीर ओंकार भोजने याने कविता म्हटली. या कार्यक्रमाला आमदार सत्यजित तांबे देखील उपस्थित होते. ओंकार भोजनेची कविता ऐकल्यानंतर त्याची ही कवितेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट करण्याचा मोह सत्यजित तांबे यांनाही आवरला नाही.

ओंकार भोजने याने या कार्यक्रमात तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची… ही कविता म्हटली. त्याचा हा व्हिडीओ सत्यजित तांबे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर शेअर केला. त्याला त्यांनी कॅप्शन दिले आहे की, ‘तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची… कमाल गायलंस मित्रा, ओंकार भोजने ! ONKAR Bhojane – Konkan Kohinoor’

सरला एक कोटी’, लक्ष वेधून घेणारी हटके कथा

नुकताच अभिनेता आणि विनोदवीर ओंकार भोजने याचा ‘सरला एक कोटी ‘ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यामध्ये त्याची भूमिका चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहे. यामध्ये त्यासोबत सरलाच्या भूमिकेत अभिनेत्री ईशा केसकर आहे. पत्त्याच्या खेळात हरलेला पती थेट पत्नी डावावर लावत करारनामा करतो. ऐकूनच चीड येणारी ही गोष्ट आहे. मात्र असाच एक वेगळा विषय ‘सरला एक कोटी’ या चित्रपटात पाहायला मिळतोय. एक हटके कहाणी असलेला हा चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा आणि उत्कंठा वाढवणारा आहे.

Exit mobile version