Download App

Box Office: कमल हासन स्टारर ‘इंडियन 2’नं बॉक्स ऑफिसवर केली धमाकेदार कमाई

Indian 2 Box Office Collection Day 1: एस शंकर हे दक्षिण चित्रपट उद्योगातील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक आहेत आणि त्यांनी बरेच चित्रपट बनवले आहेत.

Indian 2 Box Office Collection Day 1: एस शंकर हे दक्षिण चित्रपट उद्योगातील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक आहेत आणि त्यांनी बरेच चित्रपट बनवले आहेत. (Indian 2) आता त्याच्या ऑल टाईम ब्लॉकबस्टर (Blockbuster) चित्रपट इंडियनचा सिक्वेल आला आहे. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत नाही पण तरीही चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. आता या वीकेंडला कमल हसनचा (Kamal Haasan) चित्रपट 100 कोटींच्या जवळपास पोहोचला आहे.


बऱ्याच प्रतिक्षेनंतर साऊथचा सुपरस्टार कमल हासनचा (Kamal Haasan) चित्रपट ‘इंडियन 2’ चा (Indian 2 Movie) सिक्वेल आला आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 1996 मध्ये आला होता. आता 28 वर्षांनंतर कमल हासन पुन्हा कमांडरच्या भूमिकेत दिसणार आहेत. रिलीज होण्याच्या खूप आधीपासून या चित्रपटाबद्दल खळबळ उडाली होती. कमल हासन याच्या तिसऱ्या भागाबद्दल आधीच खूप उत्सुक आहे आणि अनेकवेळा त्याबद्दल बोललाही आहे. ‘इंडियन 2’ चित्रपटाने ओपनिंगच्या दिवशी काय कमाई केली चला तर मग जाणून घेऊया.

पहिल्या दिवशी चित्रपटाने किती कमाई केली?

पहिल्या दिवशी या चित्रपटाने देशभरात 25.60 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने अद्याप हिंदीत आपला ठसा उमटवला नसला तरी आगामी काळात हिंदी प्रेक्षकही या चित्रपटात आपली आवड दाखवू शकतात. या चित्रपटाने तमिळमध्ये सर्वाधिक कमाई केली आहे. या भाषेतील चित्रपटाचे कलेक्शन 16.5 कोटी रुपये आहे. तर तेलगूमध्ये या चित्रपटाने 7.9 कोटींची कमाई केली आहे.

Indian 2: कमल हसनचा ‘इंडियन 2’ चित्रपट वादग्रस्त! ‘या’ कारणांमुळे बंदी घालण्याची मागणी

तसेच खिलाडी कुमारचा म्हणजेच चाहत्यांचा लाडका अक्षय कुमारचा(Akshay Kumar) ‘सरफिरा’ (Sarafira) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाच्या विरुद्ध प्रदर्शित झाला होता. पण ‘इंडियन 2’ सलामीच्या दिवशी ‘सरफिरा’ला मोठ्या फरकाने पराभूत करताना दिसत आहे. सरफिराने पहिल्या दिवशी देशभरात 2.40 कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच कमल हसनच्या चित्रपटाने अक्षयच्या चित्रपटापेक्षा जवळपास 11 पट अधिक कमाई केली आहे.

follow us