Kamal Hasan : चित्रपटसृष्टी जगतातील एक दिग्गज व्यक्तिमत्व अभिनेता आणि निर्माता कमल हसन (Kamal Hasan) AI च्या शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना होणार आहेत. कमल हसन 69 व्या वर्षी AI चं शिक्षण घेणार आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विकसित करणारे एक व्यक्तिमत्व म्हणून कमल हसन यांची ओळख आहे. आता कमल हसन अमेरिकेत AI च्या शिक्षणासाठी जाणार आहेत.
कमल हसन यांनी उच्च युएस संस्थेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्रॅश कोर्समध्ये नावनोंदणी केलीयं. कमल हसन यांच्या या भूमिकेची सर्वांकडून प्रशंसा करण्यात येत असून नवीन आधुनिक कौशल्याचा भारतीय चित्रपटसृष्टीवर लक्षणीय परिणाम होऊन चित्रपट निर्मीतीच्या नवीन युगाची सुरुवात होणार असल्याचं मत मांडण्यात आलंय.
जयंत पाटलांनी टेन्शन वाढवलं! देवेंद्र फडणवीस अन् शरद पवारांमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत संवाद?
काही दिवसांपूर्वीच कमल हसन यांनी एका मुलाखतीद्वारे आपल्याला नवीन तंत्रज्ञानामध्ये खूप रस असून तुम्ही माझ्या चित्रपटांमध्ये मला नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानासह प्रयोग पाहु शकता, असं कमल हसन यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच चित्रपट माझे जीवन असून माझी सर्व कमाई अनेक मार्गांनी माझ्या चित्रपटांमध्येच परत गेलीयं. मी फक्त अभिनेताच नाही तर एक निर्मातादेखील आहे, चित्रपटांमध्ये कमवलेली प्रत्येक गोष्ट चित्रपटसृष्टीत गुंतवत असल्याचं हसन म्हणाले होते. दरम्यान, कमल हसन यांचं इंडियन 3, कल्की 2898 एडीच्या सिक्वलसह अनबरीव चित्रपटाचं काम सुरु आहे.