Kangana Ranaut : काहींना काही कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असणारी बॉलीवूडची (Bollywood) लोकप्रिय अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचा कारण म्हणजे तिने एका मुलाखतीमध्ये बॉलीवूडवर खळबळजनक दावा केला आहे. यामुळे सध्या सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे.
हिमाचलमधील मंडी लोकसभा मतदारसंघात (Mandi Lok Sabha) भाजपकडून (BJP) कंगना रणौत निवडणूक लढवत आहे. यामुळे ती या मतदारसंघात जोरात प्रचार करत काँग्रेससह (Congress) इतर विरोधी पक्षांवर जोरदार टीका करत आहे. तर आता तिने एका मुलाखतीमध्ये काँग्रेससह राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. तसेच या मुलाखतीमध्ये तिने बॉलिवू़डवर देखील भाष्य करत खळबळजनक दावा केला आहे.
या मुलाखतीमध्ये कंगना म्हणाली “मी बॉलिवू़डमध्ये घराणेशाहीच्या विरोधात आवाज उठवला पण राजकारणातही घराणेशाही माझी साथ सोडत नाही. पण मी राजकारणात देखील घराणेशाहीचा अंत करणार असल्याचे कंगणाने म्हटले आहे.
काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप करत कंगना म्हणाली, काँग्रेस देश विरोधी पक्ष आहे. काँग्रेसने देशाची येणारी पिढी संपवली, एकीकडे भाजप राष्ट्रवाद घेऊन देशाचा विकास करत आहे तर दुसरीकडे काँग्रेस धर्मनिरपेक्ष मतांच्या नावाखाली देशाचे विभाजन करण्याचे काम करत असल्याचा आरोप कंगणाने केला. देशात पुन्हा निवडणूका होणार नाही, मोदीजी संविधान बदलणार असा खोटा प्रचार या निवडणुकीत काँग्रेस पक्ष करत करत असल्याचे कंगणाने म्हटले.
राज्यातील अनेक नेते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार, सुनील तटकरेंचा मोठा दावा
तर बॉलिवू़डबद्दल खळबळजनक दावा करत कंगना म्हणाली, पूर्वी बॉलिवू़डमध्ये असा नियम होता की, कोणतीही नवीन हिरोईन आली की तिला दाऊदला सलाम करावा लागायचा, प्रत्येक नवीन हिरोईनला डॉनकडे जावं लागायचं मात्र आता बॉलिवू़डमध्ये बदल झाला आहे. असा खळबळजनक दावा तिने केला आहे. या दाव्यानंतर कंगना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.