राज्यातील अनेक नेते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार, सुनील तटकरेंचा मोठा दावा
Sunil Tatkare : आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Election) राज्यात महायुतीला (Mahayuti) यश मिळेल असा विश्वास देखील त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला.
पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, राज्यात 5 टप्प्यात लोकसभा निवडणुका पार पडले आहे. ही निवडणूक राष्ट्रीय पातळीची निवडणूक असल्याने या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय मुद्दे मांडण्याचा प्रयत्न महायुतीने केला मात्र विरोधकांकडून या निवडणुकीमध्ये गल्लीतील मुद्दे उपस्थित करण्यात आले असल्याची टीका सुनील तटकरे यांनी यावेळी केली.
राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळणार असून देशात पंतप्रधान मोदींना (PM Modi) 2014 आणि 2019 मध्ये जसा प्रतिसाद मिळाला तसंच आताही मिळणार यामुळे 4 जून रोजी विजय आमच होणार असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी 27 मे रोजी गवारे क्लबमध्ये राष्ट्रवादीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये सर्व नेते, पदाधिकारी तसेच सर्व जिल्हाप्रमुखांना बोलविण्यात आले आहे. आम्ही आम्ही स्पष्टपणे धोरण बांधलेले आहे, आमचे लक्ष आगामी विधानसभा निवडणुकीवर आहे. आम्ही विधानसभेसाठी संघटन मजबूत करण्याचे ठरविल आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
तसेच 27 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राज्यातील अनेक नेते प्रवेश करणार आहे. हा प्रवेश महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी देणार आणि या पक्षाप्रवेशानंतर राज्यभरात देशभरात पक्षाची ताकद वाढणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुनील तटकरे यांनी केलेल्या दाव्यानंतर राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा भूकंप येणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
27 मे रोजी जाहीर होणार दहावीचा निकाल, ‘या’ पद्धतीने पाहता येणार
तसेच राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळ स्थितीवर राज्य सरकार बैठेक घेत आहे. राज्य सरकारने पाणी टंचाई आणि अवकाळी पावसावर उपाययोजना कराव्यात अशी विनंती देखील त्यांनी यावेळी राज्य सरकारकडे केली आहे.