27 मे रोजी जाहीर होणार दहावीचा निकाल, ‘या’ पद्धतीने पाहता येणार

27 मे रोजी जाहीर होणार दहावीचा निकाल, ‘या’ पद्धतीने पाहता येणार

10th Class SSC Result Date: बारावीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल (10th Class SSC Result) कधी जाहीर होणार असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहे. आता या प्रश्नचा उत्तर मिळाला असून 27 मे रोजी दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना 27 मे रोजी दुपारी एक वाजता दहावीचा निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. यासाठी मंडळाकडून काही वेबसाईट देखील जाहीर करण्यात आले आहे.

माहितीनुसार, 2023-24  या शैक्षणिक वर्षात जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांनी राज्यात दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. तर पुणे, नागपूर,  कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना 27 मे रोजी दुपारी एक वाजता खाली दिलेल्या 5 वेबसाइटवर दहावीचा निकाल पाहता येणार आहे.

 https://mahresult.nic.in

 http://sscresult.mkcl.org

 https://sscresult.mahahsscboard.in

https://results.digilocker.gov.in

https://results.targetpublications.org

T20 World Cup 2024 साठी पाकिस्तानचा संघ जाहीर, ‘या’ स्टार खेळाडूला पुन्हा संधी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या