Download App

Kangana Ranaut: CISF गार्डने कंगनाच्या कानशिलात लगावली? चंदीगड विमानतळावर नेमकं काय घडलं?

Kangana Ranaut: कंगना रणौतला चंदिगड विमानतळावर सीआयएसएफच्या महिला जवानाने कानशिलात लगावली असल्याचा आरोप अभिनेत्री कंगना रणौतने केला आहे.

Kangana Ranaut Slapped By CISF Guard: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आणि भाजप (BJP) खासदार कंगना राणौतला (Kangana Ranaut) चंदीगड विमानतळावर सीआयएसएफ महिला गार्डने कंगना रणौतच्या कानशिलात लगावली? अभिनेत्रीने आरोप केले असून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कानशिलात मारणाऱ्या गार्डचे नाव कुलविंदर कौर असल्याचे सांगण्यात येत आहे.

कंगनाने राणौतला का मारली थप्पड?

मिळालेल्या माहितीनुसार, CISF महिला रक्षकाने चंदीगड विमानतळाच्या आत कंगना राणौतला कानशिलात लगावली? सीआयएसएफ रक्षकांना हटवून तिच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी अभिनेत्रीने केली आहे. कंगना राणौत शेतकऱ्यांच्या आंदोलनाविरोधात बोलल्यानं CISF गार्ड रागावली होती, असा दावा केला जात आहे.

कॉन्स्टेबल कुलविंदरला ताब्यात घेतले

दिल्लीत पोहोचल्यानंतर कंगनाने सीआयएसएफच्या महासंचालक नीना सिंह आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर कॉन्स्टेबल कुलविंदरला ताब्यात घेऊन चौकशीसाठी CISF कमांडंट कार्यालयात नेण्यात आले आहे.

संसदेसाठी कंगना दिल्लीला रवाना

मंडीतून लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर कंगना रणौत आज दिल्लीला रवाना झाली आहे. दरम्यान, चंदीगड विमानतळावरून कानशिलात लगावली? अशी माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर तिचा फोटो शेअर करताना कंगनाने ती संसदेत जात असल्याचे सांगितले होते. कंगनाने तिचा फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

लोकसभा निवडणूक भाजपकडून जिंकून खासदार झाली

राजकारणात नशीब आजमावण्यासाठी कंगना राणौत पहिल्यांदाच मंडीतून रिंगणात उतरली. भाजपने या अभिनेत्रीला तिच्या स्वतःच्या गावी हिमाचलमधील मंडी मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. तिकीट मिळताच कंगनाने येथे जोरदार प्रचार केला आणि 74,755 मतांनी विजय मिळवून आपल्या राजकीय डावाची जोरदार सुरुवात केली.

Siddharth P Malhotra: दिग्दर्शक सिद्धार्थ पी मल्होत्रा ​​यांनी ‘महाराज’ सिनेमाच्या लेखकांच केलं कौतुक, म्हणाले…

काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला

मंडी जागेवर कंगना काँग्रेसचे विक्रमादित्य सिंग, सहा वेळा माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांचा मुलगा आणि मंडीच्या विद्यमान खासदार प्रतिभा सिंग यांच्याशी स्पर्धा करत होती. कंगनानेही राजकारणाची राणी असल्याचे सिद्ध केले आणि विक्रमादित्य सिंगचा विक्रमी मतांनी पराभव केला.

कंगनाने विजयानंतर जनतेचे आभार मानले

निवडणूक जिंकल्यानंतर कंगना राणौतनेही मंडीतील लोकांचे आभार मानले आहेत. कंगनाने सोशल मीडियावर लिहिले की, ‘हा तुम्हा सर्वांचा विजय आहे, हा पंतप्रधान मोदीजी आणि भाजपवरील विश्वासाचा विजय आहे, हा सनातनचा विजय आहे.

कंगना राणौतचा वर्क फ्रंट

कामाच्या आघाडीवर, कंगना राणौत शेवटची तेजस चित्रपटात दिसली होती. आता अभिनेत्रीकडे पीरियड-ड्रामा ‘इमर्जन्सी’ आणि आर माधवनसोबत एक शीर्षकहीन चित्रपट पाइपलाइनमध्ये आहे.

follow us