Kangana Ranaut : ‘इंडिया आघाडी’ला भ्रष्टाचारी गँग, कंगना राणौतचा हल्लाबोल

Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कंगनाची गणना अशा सेलिब्रिटींमध्ये केली जाते जी जवळजवळ प्रत्येक मुद्द्यावर आपले मत व्यक्त करण्यासाठी ओळखली जाते. याशिवाय ती देशाच्या राजकारणावरही मोकळेपणाने बोलताना दिसते. काल कंगना संसदेच्या नवीन इमारतीच्या (New Parliament building) उद्घाटन समारंभाला हजर होती. ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच […]

Kangana Ranaut

Kangana Ranaut

Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कंगनाची गणना अशा सेलिब्रिटींमध्ये केली जाते जी जवळजवळ प्रत्येक मुद्द्यावर आपले मत व्यक्त करण्यासाठी ओळखली जाते. याशिवाय ती देशाच्या राजकारणावरही मोकळेपणाने बोलताना दिसते.

काल कंगना संसदेच्या नवीन इमारतीच्या (New Parliament building) उद्घाटन समारंभाला हजर होती. ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यासोबतच एका मुलाखतीत कंगनाने अनेक मुद्द्यांवर खुलेपणाने आपले मत मांडले.

कंगनाने इंडिया आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला
कंगना रणौतने एका माध्यमाशी बोलताना व्हिडिओ ट्विटरवर शेअर केले आहेत. एका व्हिडीओमध्ये कंगनाला विचारले आहे की, विरोधी पक्ष म्हणत आहेत की, इंडिया आघाडी (India Alliance) बनल्यानंतर देशाचे नाव बदलले कारण मोदीजी घाबरले? आणि 2024 च्या निवडणुका येत असल्याने कुठेतरी त्यांना विरोधकांची भीती वाटते का?

या प्रश्नाला उत्तर देताना कंगना म्हणाली, जे या देशाचे नेते आहेत त्यांना भ्रष्ट चेहऱ्यांची भीती वाटली पाहिजे कारण त्यांनी स्वतःचे नाव I.N.D.I.A. ठेवला आहे. त्यामुळे भिती तर नक्कीच वाटेल, कारण देशाचीही काही संस्कार आहेत.

कंगनाने पुढे सांगितले की, “जे लोक खूप खोलवर विचार करतात, त्यांना असेही वाटत असेल की कुठं स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी यांच्या मूल्यांबद्दल आपण बोलतो. तर I.N.D.I.A. अशा गँगने स्वतःचे नाव ठेवले आहे, जिथे प्रत्येक व्यक्तीवर भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यामुळे पंतप्रधान नक्कीच चिंतेत असतील.

म्हणूनच ते प्रयत्न करत आहेत. इंडियाचे नाव बदलून भारत ठेवले तर मला त्यात काही नुकसान दिसत नाही. पण ज्यांच्यावर घोटाळे आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते या नावाने टोळी तयार करू शकत नाहीत ही निश्चितच चिंतेची बाब आहे.

Exit mobile version