Download App

Emergency Film : अभिनेत्री कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ला मिळालं सेन्सॉर प्रमाणपत्र; रिलीज डेट काय?

गेल्या अनेक महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला कंगनाचा बहुचर्चित इमर्जन्सी (Emergency) चित्रपट आता प्रदर्शनसााठी सज्ज झाला.

  • Written By: Last Updated:

Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) सेन्सॉर बोर्डाकडून (Censor Board) मोठा दिलासा मिळाला. गेल्या अनेक महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला कंगनाचा बहुचर्चित इमर्जन्सी (Emergency) चित्रपट आता प्रदर्शनसााठी सज्ज झाला. नुकतंच या चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यात आलं. कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली.

सुनील टिंगरे यांचं तिकीट पक्क; अजितदादांनी स्वतः मला शब्द दिलायं 

कंगनाचा हा चित्रपट बराच काळ वादात सापडला होता. मात्र, आता या चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने लिहिलं की, आम्हाला सांगताना अत्यंत आनंद होतोय की, आमचा सिनेमा इमर्जन्सीला सेन्सॉर प्रमाणपत्र मिळालं आहे. लवकरच आम्ही सिनेमाची रिलीज डेट जाहीर करू. तुमच्या संयम आणि आधारासाठी आम्ही आभारी आहोत, असं कंगनाने म्हटलं.

दरम्यान, कंगनाचा या चित्रपटाचा 14 ऑगस्टला ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटावर वाद निर्माण झाला होता. 6 सप्टेंबर 2024 रोजी रिलीज होणार होता. मात्र, शिख संघटनांच्या विरोधानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या चित्रपटात त्यांच्या समाजाची चुकीची प्रतिमा मांडण्यात आल्याचा आरोप करत या चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी शिखांनी केली होती.

‘म्हणून…जयंत पाटलांना जबाबदारी दिली’, संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं 

दरम्यान, सीबीएफसीने यापूर्वी चित्रपटाला प्रमाणपत्र दिले होते. परंतु जेव्हा शीख समुदायाने या चित्रपटाला विरोध केला आणि प्रकरण मध्य प्रदेश उच्च न्यायालयात गेलं, त्यावेळी कोर्टाने सीबीएफसीला प्रमाणपत्र जारी करण्यापूर्वी शिखांच्या आक्षेपांचा विचार करण्याचे निर्देश दिले होते. आता या चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यात आलंय.

दरम्यान, या चित्रपटात कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली. तिने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मितीही केली. या चित्रपटात अनुपम खेर, श्रेयस तळपदे यांच्याही मध्यवर्ती भूमिका आहेत.

follow us