Singhasan Khali Karo Song Release: कंगना राणौत (Kangana Ranaut) स्टारर पॉलिटिकल ड्रामा फिल्म ‘इमर्जन्सी’ (Emergency Movie) मधील ‘सिंहासन खाली करो’ हे पहिले गाणे (Singhasan Khali Karo Song ) आज 26 ऑगस्ट रोजी रिलीज झाले आहे. नुकतचं ‘सिंहासन खली करो’ या गाण्याची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. इमर्जन्सी (Emergency ) चित्रपटाची संपूर्ण स्टार कास्ट ‘सिंहासन खाली करो’मध्ये दिसत आहे. हे गाणे उत्कटतेने आणि उत्साहाने भरलेले आहे. नुकतचं सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज झालं आहे.
‘सिंहासन खाली करो’ हे गाणे कोणी गायले?
‘सिंहासन खाली करो’ हे गाणे उदित नायरन, नकाश अजीज, नकुल अभ्यंकर यांनी एकत्र गायले आहे. ‘शिंहासन खली करो’ या गाण्याचे बोल मनोज मुंतशीर यांनी लिहिले आहेत. हे गाणे जीव्ही प्रकाश कुमार यांनी संगीतबद्ध केले आहे. कंगना राणौत, अनुपम खेर, श्रेयस तळपदे, दिवंगत अभिनेते सतीश कौशिक हे देखील गाण्यात दिसत आहेत.
कंगना राणौत भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. गाण्यात आणीबाणी लागू झाल्यानंतरची दृश्ये दाखवली जात आहेत, ज्यात विरोधक आणि सर्वसामान्यांवर पोलीस लाठीचार्ज करतात. गाण्यांदरम्यान कंगना रणौत चित्रपटातील काही महत्त्वाचे संवाद बोलताना दिसत आहे.
Emergency: रिलीजपूर्वीच वादात अडकला कंगना राणौतचा इमर्जन्सी ‘या’ कारणामुळे होतोय विरोध
चित्रपटाची स्टारकास्ट आणि रिलीज डेट?
‘इमर्जन्सी’ चित्रपटात कंगना राणौत भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात दिवंगत अभिनेते सतीश कौशिक जगजीवन रामच्या भूमिकेत, विशाक नायर संजय गांधीच्या भूमिकेत, मिलिंद सोमण सॅम माणेकशॉच्या भूमिकेत, महिमा चौधरी पुपुल जयकरच्या भूमिकेत, श्रेयस तळपदे अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत आणि अनुपम खेर जेपी नारायणच्या भूमिकेत दिसणार आहेत. इमर्जन्सी या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः कंगना राणौतने केले आहे. हा चित्रपट 6 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.