Download App

Kangana Ranaut: ‘पंगाक्वीन’ 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार? वडिलांकडून मोठा खुलासा

Kangana Ranaut : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) नेहमीच चर्चेत असते. आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) जवळपास प्रत्येक मुद्द्यावर आपले मत उघडपणे मांडताना दिसते. अभिनेत्री तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वक्तव्यांमुळे जास्त चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत होती.


कंगना 2024 ची लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवणार असल्याच्या बातम्या येत होत्या. आता तिच्या वडिलांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. कंगना भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र ती नेमकं ती कोणत्या राज्यातून निवडणूक लढणार याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

कंगना रणौत लोकसभा निवडणूक लढवणार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगना रणौतचे वडील अमरदीप यांनी भाष्य केले आहे की, अभिनेत्री पुढील वर्षी 2024 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार आहे. त्यावेळी कंगना राणौतच्या वडिलांनीही ती कुठून निवडणूक लढवायची याचा निर्णय पक्ष घेईल, असे स्पष्ट केले. कंगनाने निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे.

मात्र, अभिनेत्रीने याबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. रविवारी कंगना रणौतने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत कुल्लू येथील शास्त्रीनगर येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीपासून कंगना भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. कंगना राणौत अनेकदा नरेंद्र मोदींची प्रशंसा करताना दिसली आहे.

Saqib Saleem: ’83’ फेम साकिब सलीम सिटॅडेलचा भाग होणार का ?

कंगना रनौत वर्कफ्रंट

कंगना राणौत ही मूळची मंडी जिल्ह्यातील सरकाघाट विधानसभा मतदारसंघातील भांबला गावची रहिवासी आहे. गेल्या काही काळापूर्वी कंगना रणौतने गुजरातमधील द्वारका येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते की, जर देवाचा आशीर्वाद असेल तर ती नक्कीच निवडणूक लढवेल. कंगना राणौतच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची अॅक्शन फिल्म ‘तेजस’ मध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला. आता ती लवकरच ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात दिसणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेत्रीनेच केले आहे. ‘इमर्जन्सी’ चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट यापूर्वी नोव्हेंबर 2023 मध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु 2024 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कंगना रणौत व्यतिरिक्त चित्रपटात श्रेयस तळपदे, अनुपम खेर, दिवंगत सतीश कौशिक आणि महिमा चौधरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Tags

follow us

वेब स्टोरीज