Kangana Ranaut: ‘महिलांना पुरुषांची गरज असते…’, कंगनाच्या लक्षवेधी पोस्टने वेधल्या अनेकांच्या नजरा

Kangana Ranaut: ‘महिलांना पुरुषांची गरज असते…’, कंगनाच्या लक्षवेधी पोस्टने वेधल्या अनेकांच्या नजरा

Kangana Ranaut On neena gupta statement: बॉलिवूडची (Bollywood) पंगा क्विन अशी ओळख असणारी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. (Social media) आता देखील अभिनेत्री एक पोस्ट शेअर केली आहे. या मुळे अभिनेत्री जोरदार चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नीना गुप्ता यांनी फेमिनिज्मवर स्वतःचं सडेतोड मत स्पष्ट केलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)


‘स्त्री आणि पुरुष कधीच समान असून शकत नाही, जेव्हा पुरुष गरोदर राहिल तेव्हा स्त्री- पुरुष समान आहे,’ असं मी मानेन… असा दावा नीना गुप्ता यांनी केलं होतं. त्यांच्या दाव्यावर अनेकांनी तिला खडसावलं होत. अनेकांनी नीना गुप्ता यांना ट्रोल देखील केलं होतं. परंतु अभिनेत्री कंगना हिने नीना यांची बाजू घेत स्त्री- पुरुषांविषयी मोठं दावा केलं आहे.

कंगना म्हणाली की, ‘नीना गुप्ता यांच्या दाव्यावर अनेकजण मोठा संताप का व्यक्त करत आहेत? स्त्री आणि पुरुष कधी समान असू शकणार नाही. महिला आणि पुरुष हे वेगवेगळा आहेत. ते वेगळे नाहीत का? फक्त स्त्री- पुरुष नाही तर, आपल्यातील प्रत्येक जण वेगवेगळा आहे. म्हणून देव, गुरु, ज्येष्ठ, आई- वडील एवढंच नाही तर, प्रत्येकाचे साहेब देखील वेगळे आहेत. कोणाकडे अनुभव अधिक आहे तर, कोणाकडे अधिक विकसीत आहे. परंतु आपण कोणत्याच स्तरावर समान नाही. आपल्याला पुरुषांची गरज आहे? खरचं आहे. जशी प्रत्येक महिलेला पुरुषांची गरज असते, त्याच प्रमाणे पुरुषांना देखील प्रत्येक महिलेची गरज असते. जर माझ्या आईला तिचं आयुष्य एकटीने जगावं लागलं असतं, तर तिच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींना सामना करावा लागला असता.

Animal Leak: रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाला पायरसीचा फटका; रिलीज होताच ऑनलाईन लीक!

पुढे कंगना म्हणाली की, ‘माझे बाबा देखील आई शिवाय राहू शकले नसते. मला कळत नाही, यामध्ये नेमकी लाज कशाची वाटते? महिन्यातील एक आठवडा पुरुषांना रक्तस्राव होत नाही. त्यांच्याकडे दैवी शक्ती नाही. आज महिलांपेक्षा पुरुष जास्त सुरक्षित आहेत. खरं तर तरुण मुलींसाठी हे सोपे नाही…’, असं देखील पंगा क्विन यावेळी म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पंगा क्विनच्या पोस्टची जोरदार चर्चा रंगत असल्याचे बघायला मिळत आहे. कंगना रनौत हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री तिच्या सिनेमांमुळे नाही तर, सडेतोड वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील कंगना कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर कंगना हिच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube