Animal Leak: रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाला पायरसीचा फटका; रिलीज होताच ऑनलाईन लीक!

Animal Leak: रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाला पायरसीचा फटका; रिलीज होताच ऑनलाईन लीक!

Ranbir Kapoor Animal Leak Online in HD : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘अॅनिमल’ (Animal) हा सिनेमाचा सर्वत्र बोलबाला बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा हा सिनेमा अखेर आज चाहत्यांच्या भेटीला आला आहे. पण प्रदर्शित होताच हा सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. त्यामुळे रणबीरला आता मोठा फटका सहन करावा लागणार आहे. तसेच निर्मात्यांचे देखील कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)


रणबीर कपूर (Ranbir Kapoor), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि बॉबी देओल यांच्या ‘अॅनिमल’ (Animal) या सिनेमाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत होते. अखेर 1 डिसेंबर 2023 रोजी हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा संदीप रेड्डी वांगा यांनी सांभाळली आहे. रणबीरचा ‘अॅनिमल’ सुपरहिट होणार असल्याचं जोरदार चर्चा रंगत होती. कारण अॅडव्हान्स बुकिंगमध्येही या सिनेमाने मोठी कामगिरी केली. परंतु आता या सिनेमाबद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

रणबीरचा ‘अॅनिमल’ ऑनलाईन लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. सिनेमागृहात सिनेमा प्रदर्शित झाला की, तो ऑनलाईन लीक होण्याचं चित्र काही नवं नाही. ‘जवान’ आणि ‘टायगर 3’नंतर आता रणबीरचा ‘अॅनिमल’ हा सिनेमा ऑनलाईन लीक झाल्याचा प्रकार घडला आहे. अनेक साईट्सवर चाहत्यांना हा सिनेमा बघता येत आहे.

The Railway Men : ‘द रेल्वे मॅन’ मधील आयुष्मानच्या ‘निंदिया’ गाण्याने प्रेक्षकांना लावले वेड

मिळालेल्या माहितीनुसार, रणबीर-रश्मिकाचा ‘अॅनिमल’ हा सिनेमा फिल्मीवैप, तामिळ रॉकर्स या साईट्सवर लीक करण्यात आला आहे. या सर्व साईट्सवर हा सिनेमा HD क्वालिटीमध्ये लीक झाल्याचे बघायला मिळत आहे. सिनेमा लीक झाल्याने ‘अॅनिमल’ची टीम हैरान झाली आहे. सिनेमा ऑनलाईन लीक झाल्याने सिनेमाच्या गल्लावर नक्कीच याचा मोठा परिणाम होणार आहे. हा सिनेमा ऑनलाईन लीक झाल्याने रणबीरचे चाहते नाराज झाल्याचे बघायला मिळत आहेत. परंतु तरी देखील हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका करणार असल्याचे सांगितले जात आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी ‘अॅनिमल’ 40 कोटींपेक्षा जास्त कमाई करणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube