The Railway Men : ‘द रेल्वे मॅन’ मधील आयुष्मानच्या ‘निंदिया’ गाण्याने प्रेक्षकांना लावले वेड

The Railway Men : ‘द रेल्वे मॅन’ मधील आयुष्मानच्या ‘निंदिया’ गाण्याने प्रेक्षकांना लावले वेड

The Railway Men Song : ‘द रेल्वे मेन’ या (The Railway Men) सीरिजचा सध्या देशात जोरदार बोलबाला होत आहे. जगभरातील सिनेरसिकांच्या ही सीरिज चांगलीच पसंतीस उतरली आहे. भोपाळ दुर्घटनेवर बेतलेल्या ‘द रेल्वे मेन’ या अस्वस्थ करणाऱ्या सीरिजची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या सिनेमातील आयुष्मान खुरानाच्या (Ayushmann Khurrana ) गाण्यानं सर्वांचेच मन जिंकून घेतले आहे.

‘द रेल्वे मेन’ ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) रिलीज करण्यात आली आहे. फक्त भारतीयच नव्हे तर परदेशातील चाहत्यांच्या देखील ही सीरिज खूपच आवडली आहे. काळजाचा ठोका चुकवणारी ही सीरिज आहे. या सीरिजमधील सर्वच कलाकारांनी आपली भूमिका उत्तमरित्या निभावली आहे. वर्षाच्या शेवटी रिलीज झालेली ही सीरिज सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ट्रेडिंगमध्ये (trading) असल्याचे बघायला मिळत आहे.

‘द रेल्वे मेन’ ही सत्य घटनेवर आधारित सीरिज आहे. भोपाळमधील युनियन कार्बाइड कंपनीच्या 1984 मध्ये कारखान्यातून विषारी वायूची गळती झाली होती. यामध्ये 15 हजारांहुन जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. याच सत्य घटनेवर आधारित ही सीरिज बनवण्यात आली आहे. 18 नोव्हेंबर 2023 रोजी ही सीरिज चाहत्यांच्या भेटीला आली आहे. नेटफ्लिक्सवर ही सीरिज चाहत्यांना बघता येणार आहे.

‘द रेल्वे मेन’ या सीरिजचं सध्या जगभरात तोंडभरून कौतुक होत आहे. 18 नोव्हेंबरला रिलीज झालेली ही सीरिज नेटफ्लिक्सवर सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण देशांमध्ये ही सीरिज ट्रेडिंगमध्ये आहे. नेटफ्लिक्स आणि वायआरएफ एंटरटेनमेंटअंतर्गत निर्मिती करण्यात आलेली ही पहिली सीरिज आहे. आशा आणि मानवतेची एक रोमांचक कथा चाहत्यांना या सीरिजमध्ये बघायला मिळत आहे.

Gautami Patil : ‘सबसे कातील गौतमी पाटील’च्या ‘घुंगरु’ सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज

‘द रेल्वे मेन’ या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा शिव रवैल यांनी सांभाळली आहे. सीरिजच्या यशाबद्दल बोलत असताना ते म्हणाले की, “द रेल्वे मेन’च्या निर्मितीचा प्रवास खूपच भावनिक होता. सत्य लोकांसमोर आणण्याच्या हेतुने या सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे. या सीरिजचं दिग्दर्शन मला करण्याची संधी मिळाली याचा नक्कीच आनंद आहे. नेटफ्लिक्सच्या माध्यमातून ही सीरिज देशभरात अनेक वेगवेगळ्या दर्जाच्या चाहत्यांपर्यंत पोहोचली आहे. जगाच्या चारही कोपऱ्यातून या सीरिजला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहेत. देशांमध्ये सीरिज ट्रेंड होणं ही सुखद बाब आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी दिली आहे.

‘द रेल्वे मेन’ या सीरिजमध्ये आर माधवन, केके मेनन, दिव्येंदु आणि बाबिल खान हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये आहेत. आयुष गुप्ता यांनी या सीरिजची कथा लिहिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube