Download App

Chandramukhi 2: खिळवून ठेवणारा थरार अन् कंगना रणौतचं जबदस्त लूक; बहुचर्चित ‘चंद्रमुखी २’चा ट्रेलर प्रदर्शित

Chandramukhi 2 Trailer Out: मनोरंजन क्षेत्रातील ‘पंगाक्वीन’ अर्थात साईवांची लाडकी कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या आगामी ‘चंद्रमुखी 2’ (Chandramukhi 2) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आली आहे. चंद्रमुखी 2 या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून चंद्रमुखी 2 बद्दल अनेक गोष्टींच्या चर्चना उधाण आले होते. अभिनेत्रीचा हा सिनेमा एक हॉरर आणि कॉमेडी आहे. यामध्ये ती चंद्रमुखीची मुख्य भूमिका साकारत आहे. सिनेमाच्या ट्रेलरने प्रदर्शित होताच सोशल मीडियावर जोरदार खळबळ उडवून दिल्याचे बघायला मिळाले आहे.

नेमकं काय आहे ‘चंद्रमुखी 2’ ट्रेलर
ट्रेलरच्या सुरूवातीलाच राघव लॉरेन्सची जोरदार एंट्री केल्याचे बघायला मिळत आहे. त्यानंतर पुढे सिनेमाची सुरूवात सुखी कुटुंबापासून होते. जो वाड्यामध्ये राहायला येतो. आणि तिथे त्याची भेट चंद्रमुखीच्या आत्म्याशी होते. सिनेमाची संपूर्ण कथा परत एकदा चंद्रमुखीभोवती फिरते असल्याचे बघायला मिळत आहे. बहुचर्चित अशा चंद्रमुखी 2 चा ट्रेलर येताच त्यावर चाहत्यांनी जोरदार कौतुकाचा वर्षाव करत आहेत. हॉरर, सस्पेन्स या प्रकारातील सिनेमानं चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. कंगनानं चंद्रमुखी मध्ये एका नर्तिकेची भूमिका केली आहे. तो राघव लॉरेन्सनं राजा वेट्टीयान राजाची भूमिका साकारला आहे.

‘चंद्रमुखी 2’ या थरार नाट्य असलेल्या सिनेमाची चाहते चांगलेच प्रतीक्षा करत आहेत. पी. वासु यांनी या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर कंगना रनौतसह या सिनेमात वडिलेलू, सृष्टी डांगे आणि लक्ष्मी मेनन देखील महत्त्वाच्या भूमिकेमध्ये बघायला मिळणार आहे. हा सिनेमा १९ सप्टेंबर २०२३ दिवशी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. कंगनाचा आगामी ‘इमर्जन्सी’ (Emergency) हा सिनेमाही चाहत्यांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. या सिनेमामध्ये ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत बघायला मिळाली आहे.

Video : प्रगतीपुस्तकावर बाबांच्या खोट्या सह्या करायची अमृता; ‘बाबांना माहित पडल्यानंतर त्यांनी रात्रभर…’

या दोन्ही सिनेमांची चाहते आता प्रतीक्षा करत आहेत. ‘चंद्रमुखी 2’ हा सिनेमा २००५ मध्ये आलेल्या पी. वासु दिग्दर्शित सिनेमाचा सीक्वेल असणार आहे. या सिनेमामध्ये थलायवा आणि ज्योतिका मुख्य भूमिकेत झळकले होते. आता चाहत्यांना ‘चंद्रमुखी 2’ या सिनेमाचा सीक्वेल आहे. तामिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तसेच कंगनाचा ‘टिकू वेड्स शेरू’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन हे साई कबीर श्रीवास्तव यांनी केले आहे. ‘टिकू वेड्स शेरू’ हा सिनेमा अशा एका व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे. जो मुंबईमध्ये अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी जोरदार स्ट्रगल करत असल्याचे बघायला मिळत असतो.

Tags

follow us