Video : प्रगतीपुस्तकावर बाबांच्या खोट्या सह्या करायची अमृता; ‘बाबांना माहित पडल्यानंतर त्यांनी रात्रभर…’

  • Written By: Published:
Video : प्रगतीपुस्तकावर बाबांच्या खोट्या सह्या करायची अमृता; ‘बाबांना माहित पडल्यानंतर त्यांनी रात्रभर…’

Amruta Khanvilkar : आपल्या अभिनयाने आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांना वेड लावणारी लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. अमृताने अनेक चित्रपटात काम केले. ‘चंद्रमुखी’मधली तिची भूमिका चांगलीच गाजली होती. मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमृता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात तिने तिच्या बालपणीचा किस्सा सांगितला. यात तिने तिच्या आयुष्यातील महत्वाच्या सहीबद्दल संगितलं. ती सही होती तिच्या बाबांची. आणि त्यांची सही करणं तिला चांगलचं महागात पडलं होतं.

अमृता अलीकडेच अवधूत गुप्तेंच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी अवधूत गुप्तेंनी तिला ज्या अमृता खानविलकरच्या सह्या घेण्यासाठी आज चाहते उत्सुक असतात, तिच अमृता बालपणी वडिलांच्या खोट्या सह्या करायची? हे खरंय का? असा प्रश्न विचारला.

अवधूत गुप्तेंच्या या प्रश्नाला उत्तर देताना अमृताने शाळेतील एक आठवण शेअर केली. ती म्हणाली, हो, हे अगदी खरं आहे… कारण, मी लहान असताना खूप वात्रट आणि मस्तीखोर होते. मला अभ्यास करायला अजिबात आवडायचं नाही. शाळेत खिडकीजवळ बसून मी कावळे-चिमण्यांची चित्र काढायची. वर्गात माझं लक्ष नसायचं त्यामुळं शिक्षक माझ्यावर ओरडायचे. शिक्षक माझ्या प्रगतीपुस्तकावर तक्रारी लिहून द्यायचे आणि सही आणायला सांगायचे. मग मी त्यांची खोटी सही करायची.

अमृता पुढे म्हणाली, एका वेळेनंतर माझ्या मॅडमला वाटलं की, हिचे वडील काहीच कसे बोलत नाहीत. मग एकदा मला आमच्या मॅडमने आई-वडिलांना बोलावून घे, असं सांगितलं. आई-बाबा शाळेत आल्यावर, तुमच्या मुलीच्या 18 तक्रारी लिहून दिल्या आहेत. तुम्ही सतत सह्या करून का देता ? तिला काही तरी बोला अशी तक्रार मॅडमने बाबांकडे कली.

बाबांना मॅडमनी सह्या दाखवल्या. माझे बाबा प्रगतीपुस्तकावरील सही पाहून म्हणाले अरे ही कोणाची सही आहे…. मग माझ्या घरी खोट्या सह्यांचा प्रकार समजला. बाबा घरी आले तेव्हा त्यांनी मला रात्रभर ओणवं उभं केलं होतं. माझ्या पाठीवर पुस्तक ठेवून मला शिक्षा केली होती. असं सगळं बालपणीच किस्से आहेत, असं अमृताने सांगितलं.

दरम्यान, अमृता आणि तिचे डान्सवरचे प्रेम सर्वांनाच माहितत आहे. यापूर्वी नच बलिए, झलक दिखला जा, या शोमध्ये सहभागी होऊन तिनिे चाहत्यांची मन जिलंकली होती. चंद्रमुखीनंतर अमृता लवकरच ललिता बाबरच्या बायोपिकमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube