Download App

असदचा एन्काउंटर होताच नाचायला लागली कंगना रणौत; म्हणाली, “योगी दादांसारखा…”

Kangana Ranaut : उमेश पाल खून प्रकरणातील (Umesh Pal murder case) आरोपी असद अहमद आणि गुलाम (Asad Ahmed Gulam) यांना यूपी एसटीएफने चकमकीत ठार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत जेव्हा जेव्हा एनकाउंटर झाले तेव्हा अनेक सवाल देखील उपस्थित झाले आहेत. एकीकडे अतिक अहमदच्या मुलाच्या एन्काऊंटर झाल्यावर जल्लोष सुरू असतानाच काहीजण याला कट म्हणत निषेध करण्यात येत आहेत.

या घडामोडीवर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) देखील प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री कंगना रणौतने ट्वीट करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडिओ देखील तिने यावेळी शेअर केला आहे. माझे बंधू योगी आदित्यनाथ यांच्यासारखे कोणीच नाही. यावेळी तिने हात जोडण्याचे इमोजी देखील शेअर केले आहे.

कंगनाने शेअर केलेल्या या व्हिडिओत विधानसभेमध्ये योगी आदित्यनाथ यांनी उमेश पाल यांच्या आरोपींना कठोर शिक्षा करणार असल्याचे स्पष्ट सांगितले होते. उमेश पाल खून प्रकरणामधील आरोपी असद आणि गुलाम हे झाशीजवळील बारागाव आणि चिरगाव येथे पोलिसांच्या चकमकीत ठार करण्यात आले आहे. ते १५ दिवस कानपूर, नोएडा आणि दिल्लीत लपून बसल्याची माहिती पोलिसांना होती.

Ved Movie On OOT : वेडच्या चाहत्यांना आनंदाची बातमी, वेड चित्रपट पाहा ‘या’ ओटीटीवर

त्यानंतर ते झाशीला गेले. पोलिसांना ते झाशीत आल्याची माहिती मिळताच त्यांनी परिसरात वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू करण्यास सुरुवात केली. शरण येण्याऐवजी असदने पोलिसांवरच गोळीबार करण्यास सुरुवात केली आणि प्रत्युत्तरादाखल दोघांना देखील ठार करण्यात आले.

Tags

follow us