Kangana Ranaut Marriage Plan: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut ) ता खासदार म्हणूनही ओळखली जाते. अलीकडेच त्यांनी हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून (Mandi Lok Sabha) 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. आता कंगना राणौत संसदेत पोहोचली आहे. कंगना आता (Kangana Ranaut) एकाच वेळी दोन जबाबदाऱ्या पार पाडत आहे. नुकताच कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा (Emergency) ट्रेलर रिलीज झाला, यावेळी अभिनेत्रीने मीडियाच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. तर आता कंगना राणौतने तिच्या लग्नाचा खुलासा केला आहे. कंगना राणौतने सांगितले की, तिला आता लग्न करायचे आहे आणि तिला स्वतःचे कुटुंब हवे आहे.
प्रत्येकाचा जोडीदार असावा
कंगना राणौत अलीकडेच राज शामानीच्या पॉडकास्टवर दिसली. यावेळी राज शमानी यांनी तिला त्यांच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला. त्यावेळेस ती म्हणाली की, ‘मला आता लग्न करून कुटुंब सुरू करायचे आहे, नक्कीच.’
राजने तिला पुढे विचारले की, ‘लग्न करणे अनिवार्य आहे का?’ तर अभिनेत्री म्हणाली, ‘मला वाटतं प्रत्येकाचा जोडीदार असावा. जोडीदारासोबतही अडचणी येतात, पण जोडीदाराशिवाय आणखी अडचणी येतात. तुमचा जोडीदार तुम्हाला शोधावा लागतो ही वेगळी गोष्ट. तुमच्या बाबतीत घडणारी ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.
लहान वयात लग्न केल्याने जुळवून घेणे सोपे
कंगना रणौत पुढे म्हणाली, ‘तुम्ही जसजसे मोठे होतात तसतसे तुमच्यासाठी एकमेकांशी जुळवून घेणे अधिक कठीण होत जाते. जर तुम्ही लहान वयात लग्न केले तर ते खूप सोपे आहे. खेड्यापाड्यातील लोकांची लग्ने अगदी लहान वयात होत असतात. याशिवाय तुमची आवड त्यावेळी इतकी प्रबळ असते की, तुम्ही तरुण असताना तुमची आवड वाहणे खूप सोपे असते.
‘मी जे म्हणाले होते तेच झालं, पंजाबच्या घटनेवर Kangana Ranaut ची पोस्ट चर्चेत
कंगनाचा ‘इमर्जन्सी’ 6 सप्टेंबरला रिलीज होणार
कंगना राणौतचा आगामी चित्रपट ‘इमर्जन्सी’ 6 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. यामध्ये कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनाने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.