‘मी जे म्हणाले होते तेच झालं’, पंजाबच्या घटनेवर Kangana Ranaut ची पोस्ट चर्चेत

‘मी जे म्हणाले होते तेच झालं’, पंजाबच्या घटनेवर Kangana Ranaut ची पोस्ट चर्चेत

अभिनेत्री कंगना रनौत ( Kangana Ranaut ) ही आपल्या बोल्ड आणि बिंधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. ती कायम आपल्या भूमिका सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असते. त्यामुळे ती अनेकदा ट्रोल देखील झालेली आहे. अनेकवेळी ती आपल्या राजकीय भूमिका उघडपणे मांडते. आता तिने एक फेसबुक पोस्ट लिहली आहे. यामध्ये तिने दोन दिवसांपूर्वी पंजाबमध्ये जी घटना घडली होती, त्यावर भाष्य केले आहे.

“पंजाबमध्ये जे काही घडत आहे, ते मी दोन वर्षांपूर्वी भाकीत केले होते.  माझ्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले, माझ्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले. पंजाबमध्ये माझ्या गाडीवर हल्ला झाला, लेकीन वही हुआ ना जो मैने कहा था, आता बिगर खलिस्तानी शिखांनी तिथली भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आली आहे”, असे कंगनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान दोन वर्षांपूर्वी जे शेतकरी आंदोलन झाले होते, तेव्हा कंगनाने त्या आंदोलनाला खलिस्तानवादी म्हटले होते. यानंतर जेव्हा ती पंजाबमध्ये गेली होती, तेव्हा तिच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. या तिच्या वक्तव्यानंतर अनेक ठिकाणी तिच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती.

दोन दिवसांपूर्वी पंजाबच्या अमृतसरमधील अजनाला पोलिस ठाण्यामध्ये एक आरोपीला आणले होते. त्याला सोडवण्यासाठी खलिस्तानी संघटना ‘वारिस पंजाब दे’  या संघटनेचा अमृतपाल सिंह याने आपल्या समर्थकांसह पोलिस स्टेशनवर हल्ला केला होता. या लोकांनी 800 पोलिसांना हकलवले होते.

(Letssupp Special : फडणवीस असे उत्तर देतात की गोगावले, बच्चूभाऊ, शिरसाट यांची धडधड वाढते….)

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube