Kangana Ranaut: ‘द केरल स्टोरी’ (The Kerala Story) सिनेमावरून मोठा वाद पाहायला मिळत आहे. सिनेमामधील दावे खोटे असल्याचे म्हणत त्यावर बंदी घालण्याची मागणी देखील करण्यात आली, पण कोर्टाने (High Court) त्यास नकार दिला आणि सिनेमा काल प्रदर्शित झाला. सिनेमाने पहिल्या दिवशी मोठी कमाई देखील केली आहे. या सिनेमाबद्दल सुरू असलेल्या वादावर कंगना रणौतने (Kangana Ranaut) मोठा गौप्यस्फोट केला आहे.
तिने एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना कंगना रणौतने ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाबद्दल मोठा गौप्यस्फोट केले आहे. ती म्हणाली, “बघा, मी हा सिनेमा पाहिला नाही, पण सिनेमावर बंदी घालण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. मी आजच वाचलं, जर मी चुकीची असेल तर दुरुस्त करा, पण सिनेमावर बंदी घालता येणार नाही असं हायकोर्टाने सांगितले आहे. मला वाटतं की तो सिनेमा आयएसआयएस (ISIS ) शिवाय कोणालाही वाईट किंवा चुकीचे म्हणत नाही.
देशामध्ये सर्वात जबाबदार संस्था उच्च न्यायालय असे म्हणत असेल तर त्यांचे म्हणणे अचूक आहे. ISIS ही दहशतवादी संघटना आहे. मी त्यांना दहशतवादी म्हणत आहे, असं नाही, तर आपला देश, गृहमंत्रालय आणि इतर देशांनी देखील त्यांना तेच म्हटले आहे. तसेच कंगना पुढे म्हणाली की, जर तुम्हाला वाटत असेल की ती दहशतवादी संघटना नाही, तर मग तुम्हीही दहशतवादी आहात हे उघड आहे.
‘The Kerala Story’ सिनेमाच्या ट्रेलरवर युट्यूबची मोठी कारवाई; अभिनेत्री, म्हणाली…
जर तुम्हाला वाटत असेल की एखादी दहशतवादी संघटना दहशतवादी (terrorist) नाही. त्या संघटनेला कायदेशीर, नैतिकदृष्ट्या, सर्व प्रकारे दहशतवादी घोषित करण्यात आले आहे, पण तुम्हाला तसं वाटत नसेल तर ती सिनेमाची नाही तर तुमची समस्या आहे. तुम्ही अगोदर विचार केला पाहिजे की तुम्ही आयुष्यात कुठे उभे आहात?” असा सवाल कंगनाने केला आहे.
कंगनाने सिनेमाला विरोध करणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. “मी अशा लोकांबद्दल बोलत आहे, जे विचार करत आहेत की हा सिनेमा ISIS वर नाही तर त्यांच्यावर हल्ला करत आहे. तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही दहशतवादी आहात. इतकं साधं हे गणित आहे,” असा मोठा गौप्यस्फोट कंगनाने यावेळी केला आहे.