‘The Kerala Story’ सिनेमाच्या ट्रेलरवर युट्यूबची मोठी कारवाई; अभिनेत्री, म्हणाली…

  • Written By: Published:
youtube took action on the trailer the kerala story movie

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट (The Kerala Story) आज (५ मे) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. मात्र, या सिनेमाच्या कथेवरून प्रदर्शनापूर्वीच हा सिनेमा मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे, अनेकांनी या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याबाबत याचिका देखील दाखल करण्यात आली होती.

परंतु न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. आता सिनेमाच्या ट्रेलरवर (Movie trailers) यूट्यूबने मोठा आक्षेप घेत कारवाई केली आहे. यूट्यूबने अनेक दिवसांपूर्वी ही कारवाई केली होती. पण आता एका यूजरने यूट्यूबवरून त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ट्वीट केले आहे. युजरने ट्वीट केले की ‘द केरळ स्टोरी’चा ट्रेलर सर्च केल्यावर यूट्यूबवरून एक इशाराचिन्ह दिसेल, असे स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे.

ज्यावर लिहिले आहे की हा कंटेंट आत्महत्या आणि आत्महानीशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. यूट्यूबच्या या कारवाईनंतर सिनेमाची अभिनेत्री अदा शर्मा चांगलीच भडकली आहे. अदाने ‘सत्यमेव जयते, सत्याचा विजय होईल…’, असे कॅप्शन देत ते री-ट्वीट केले आहे.

एमटीव्ही रोडीजचा धमाकेदार प्रोमो जारी…रिया चक्रवर्ती दिसणार अ‍ॅक्शन मोडमध्ये

काय आहे नेमका सिनेमाचा वाद?

दरम्यान केरळमध्ये लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकून ३२ हजार हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचे धर्मांतर करण्यात आल्याचा दावा ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमामधून दाखवण्यात आला आहे. हा सिनेमा सत्यघटनेवर आधारित असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे. यामुळे या सिनेमाचा मोठा वाद निर्माण झाला आहे.

Tags

follow us