Download App

Tiku Weds Sheru: कंगनाचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाली, ‘नवाजुद्दिन नव्हे तर इरफान खानला घेऊन करायचा…’

Tiku Weds Sheru: ‘सेक्रेड गेम्स’ फेम नवाजुद्दिन सिद्दिकीने (Nawazuddin Siddiqui) बॉलीवूडमध्ये आपले महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. अभिनेता त्याच्या आगामी सिनेमात अभिनेत्री अवनीत कौरसोबत (Avneet Kaur) पहिल्यांदा स्क्रीन शेअर करणार आहे. या दोघांचा ‘टिकू वेड्स शेरू’ (Tiku Weds Sheru) हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चेत होता. आधी हा सिनेमा सिनेमागृहांत प्रदर्शित होणार होता. परंतु, काही कारणास्तव आता हा सिनेमा निर्मात्यांनी ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

बुधवारी (१४ जून) या सिनेमाचा ट्रेलर अ‍ॅमेझॉन प्राइमवर रिलीज करण्यात आला आहे. ‘टिकू वेड्स शेरू’ सिनेमाची निर्मिती कंगना राणौतच्या (kangana ranaut) मणिकर्णिका फिल्म्सने केली आहे. या सिनेमाच्या ट्रेलर प्रदर्शित करण्याच्यावेळी कंगना, नवाजुद्दिन आणि अवनीत या तिघांनी उपस्थिती लावली अन् सिनेमाबद्दल वेगवेगळ्या आठवणी आणि अनुभव लोकांसमोर शेअर केले.

या इव्हेंटच्या दरम्यान कंगनाने या सिनेमाबद्दल आणि दिवंगत अभिनेता इरफान खानशी (Irfan Khan) असलेल्या कनेक्शनबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. याबद्दल बोलत असताना कंगना म्हणाली की, “हा सिनेमा माझ्यासाठी डेब्यूसारखाच आहे, शिवाय हा सिनेमा करण्या पाठीमागील एक खास कारण देखील आहे, जे मी आजवर कोणालाच सांगितले नाही. खरं तर अगोदर या सिनेमाची घोषणा झाली होती. तब्बल ६ ते ७ वर्षांपूर्वी मी आणि इरफान या सिनेमावर काम करत होतो.

Kon Honar Crorepati: जमणार तीन जिवलग मित्रांचा कट्टा! मांजरेकर, साटम अन् खेडेकरांनी उलगडली एकमेकांची गुपित

त्यावेळी आम्ही मीडियाला आमंत्रित करून एक मोठा कार्यक्रम देखील आयोजित केला होता. त्यावेळी या सिनेमाचे नाव ‘डिव्हाइन लवर्स’ असं होतं. दुर्दैवाने त्यानंतर आमचा दिग्दर्शक आजारी पडला, आम्ही बराच प्रयत्न केला, पण २-३ वर्षं काहीच घडत नसल्याने आम्ही या सिनेमाचा विचारच सोडून दिला होता. ‘टिकू वेड्स शेरू’ हा एक कॉमेडी-ड्रामा सिनेमा आहे, टिकू आणि शेरू ही दोन्ही पात्रं एकमेकांपासून खूप वेगळी आहेत, पण दोघांचंही स्वप्न स्टार होण्याचे आहे.

अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकीचा नुकताच आलेला ‘जोगीरा सा रा रा’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करू शकला नाही. आता ‘टिकू वेड्स शेरू’ मध्ये अभिनेता पहिल्यांदा अवनीत कौरसोबत काम करणार आहे. हा सिनेमा २३ जूनला अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Tags

follow us