घराणेशाहीच्या मुद्द्यावरून कंगणा राणौत भडकली, म्हणाली, “गँग करुन…”

Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली आहे आणि ती सध्या हॉलिवूडमध्ये चांगले काम करत आहे. नुकतंच तिने बॉलिवूडमधील सुरु असलेल्या विषयांवर भाष्य केल्याने ती पुन्हा चर्चेत आली. बॉलिवूडमधील (Bollywood) होत असलेल्या राजकारणाला कंटाळूनच तिने अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्याचं डेक्स शेफर्डचा पॉडकास्ट या शोमध्ये सांगितल. यावर आता बॉलिवूडची ‘धकड’ […]

Rahul Gandhi हे 3 इडियट्सप्रमाणे आईच्या महत्त्वाकांक्षेचे बळी; कंगनाचा टोला

Kangana Ranaut

Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली आहे आणि ती सध्या हॉलिवूडमध्ये चांगले काम करत आहे. नुकतंच तिने बॉलिवूडमधील सुरु असलेल्या विषयांवर भाष्य केल्याने ती पुन्हा चर्चेत आली. बॉलिवूडमधील (Bollywood) होत असलेल्या राजकारणाला कंटाळूनच तिने अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्याचं डेक्स शेफर्डचा पॉडकास्ट या शोमध्ये सांगितल. यावर आता बॉलिवूडची ‘धकड’ गर्ल कंगना राणौतने (kangana ranaut) भाष्य करत प्रियांकाला चोप्राला आपला पाठिंबा दर्शविला आहे. बॉलिवूडमधील घराणेशाहीवर कंगनाने निशाणा साधला. यावर कंगनाने ट्वीट देखील केले आहे.

ट्वीटमध्ये कंगनाने राणौतने म्हणलं आहे. “खरं आहे. सगळे चूकीच्या, अपरिपक्व लोकांपुढे वाकतात. यामुळे अशा व्यक्ती गॅंग तयार करुन दादागिरी करतात आणि इतरांना त्रास देत असतात. एवढंच नाही तर यशस्वी लोकांचा ते जीवही घेतात. एमेडियस हा चित्रपट घराणेशाहीवर भाष्य करतो. हा माझा आवडता चित्रपट आहे. असे ट्विट करत कंगना राणौतने सांगितल.

या आधीच्या काळात कंगना राणौतने प्रियांका चोप्राच्या बॉलिवूड सोडून जाण्याच्या पाठीमागचे कारण चित्रपट निर्माता करण जोहरला निशाणा साधला होता. याबाबत कंगनाने ट्वीट करत करणवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कंगना रणौतने ट्विटरच्या माध्यमातून करण जोहरवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. करण जोहरने प्रियांका चोप्रावर बॉलिवूडमध्ये काम करण्यास बंदी घातली होती. त्यामुळेच तिला भारत सोडून जावं लागलं असा आरोप कंगनाने राणौतने केला.

Girish Bapat : ‘तुमच्या छत्रछायेत मी लहानाची मोठी झाले’ बापटांच्या निधनानंतर अभिनेत्री भावूक

गेल्या काही दिवसांपूर्वी प्रियांकाने एका मुलाखतीमध्ये नाव न घेता सांगितले होते की तिला बॉलिवूडमध्ये कॉर्नर केलं जात होतं. कोणत्याही चित्रपटांमध्ये घेतलं जात नव्हतं, मला खूप जणांकडून तक्रारी आहेत. मला बॉलिवूडमध्ये गेम खेळता येत नाही, परंतु इथल्या राजकारणाला मी कंटाळले होते. त्यामुळे मला ब्रेक घ्यायचा होता, अशी प्रतिक्रिया प्रियांका चोप्रांनी दिली होती.

Exit mobile version