Download App

Kangana Ranaut: ‘ती’ गोष्ट बेडरूमपर्यंतच ठेवा; कंगना रनौतचे मोठं गौप्यस्फोट; ट्वीट करत म्हणाली…

Kangana Ranaut: बॉलीवूडची स्पष्टवक्तेपणा करणारी अभिनेत्री कंगना रनौत (kangana ranaut ) प्रत्येक गोष्टीवर आपले मत उघडपणे मांडत असते. तिला तिचे विचार सर्वांबरोबर शेअर करायला आवडत असतात. तिच्या विधानांमुळे अभिनेत्री अनेकदा वादात सापडते पण अनेक प्रकरणावर ती आपले मत व्यक्त करण्यापासून कधीच मागे हटत नाही.

दरम्यान सुप्रीम कोर्टामध्ये (Supreme Court) समलैंगिक विवाहाविषयी (same sex marriage)सुरू असलेल्या सुनावणीच्या दरम्यान तिने जेंडर आणि सेक्शुअल प्रेफरन्स यासंदर्भात मोठं गौप्यस्फोट केली आहे. कंगनाने तिच्या ट्विटमध्ये जेंडर आणि सेक्शुअल प्रेफरन्स याविषयी आपले मत मांडले आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार एखाद्या व्यक्तीला त्याचे जेंडर आणि लैंगिकतेच्या आधारावर न्याय दिला जाऊ नये. आणि जे लोकं असं करत असतात, ते आयुष्यात जास्त पुढे जात नाही.


कंगनाने अशा लोकांची चांगलीच खिल्ली उडवली आहे, जे आपले जेंडर ही ओळख बनवून त्याच आधारे सगळीकडे फिरत असल्याचे दिसतात. कंगनाने तिच्या ट्विटमध्ये लैंगिक तटस्थतेविषयी देखील लिहिले आहे. कंगनाने ट्विटद्वारे सर्वाना हे समजवून देण्याचा प्रयत्न केला आहे की, तुम्ही कोणीही असाल, ती पुरुष, स्त्री, इतर कोणी असेल, तुमचे जेंडर काय आहे, याने कोणाला काही फरक पडत नाही.

या जमान्यात आपण अभिनेत्री, महिला दिग्दर्शक असे शब्द वापरत नाही. त्यांना आपण अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणत असतो. तुम्ही या युगात काय करत आहात ही तुमची ओळख असणार आहे, तुम्ही बेडरूममध्ये काय करता यामुळे तुमची ओळख होत नाही, असा गौप्यस्फोट तिने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तुमची लैंगिक पसंती काही असली तरी ती तुमच्या बेडरूमपर्यंत राहिली पाहिजे. त्यांना तुमचे ओळखपत्र बनवून ते सर्वत्र दाखवू नका.


तुमचे जेंडर ही तुमची ओळख नाही, ती स्वतः ग्रामीण भागातील एक स्त्री आहे, जीवनाने तिला कोणतीही सवलत दिली नाही, तिला अभिनेते, चित्रपट निर्माते, निर्माते आणि लेखकांच्या जगात आपले स्थान निर्माण करायचे आहे. कंगनाने लागोपाठ ३ ट्विट करत समजवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामध्ये कंगनाने स्वतःला फक्त महिला समजणाऱ्यांना अशी चूक करू नये, असा देखील इशारा तिने आपल्या ट्विटमधून दिला आहे.

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती

कंगनाचे तिन्ही ट्विट जेंडर, फिजीकल, सेक्शुअल प्रेफरन्स यावर आधारित आहेत. दरम्यान सुप्रीम कोर्टात समलैंगिक विवाहासंबंधी याचिकेचा खटला सीजेआय डी वाय चंद्रचूड, जस्टिस एस के कौल, एसआर भट, हिमा कोहली आणि पीआर नरसिंह यांच्या घटनापीठासमोर सध्या सुरु आहे.

Tags

follow us