Download App

Kangana Ranaut अन् जावेद अख्तर यांच्यातील वाद चिघळला; कोर्टाने अभिनेत्रीकडे केली ‘ही’ मागणी !

  • Written By: Last Updated:

Kangana Ranaut Vs Javed Akhtar: मुंबईच्या अंधेरी येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने प्रसिद्ध कवी-गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या अर्जावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतकडून ( Kangana Ranaut) उत्तर मागितल्याचे सांगितले जात आहे. यात त्यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टाने जारी केलेल्या समन्सच्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे. कंगनाने दाखल केलेल्या खटल्यामध्ये जावेद अख्तर यांना दंडाधिकारी न्यायालयाने समन्स बजावल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयाला जावेद अख्तर यांनी सत्र न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.के. झेड. खान यांनी कंगना रनौतला नोटीस बजावून उत्तर मागितले सांगितले जात आहे.

Ahmednagar News : काय ते धोंडे जेवण, काय तो पाहुणचार... 'अधिकमास' एकदम ओके! | LetsUpp Marathi

आता या प्रकरणाची सुनावणी २४ ऑगस्टपर्यंत पुढे ढकली आहे. जावेद अख्तर यांनी सत्र न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, ‘प्रथमदर्शनी, न्यायदंडाधिकारी यांच्याकडे अस्पष्ट आदेश पारित करण्यात आली आहेत, तसेच पुरेशी सामग्री उपलब्ध होती हे दाखवण्यासाठी न्यायालयीन रेकॉर्डवर काही नाही. दंडाधिकार्‍यांनी संपूर्ण तथ्यात्मक पैलू आणि न्यायालयीन नोंदी न बघता तक्रारीमध्ये केलेल्या निराधार आणि सिद्ध न झालेल्या विधानांवर कारवाई करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

कंगना रनौत आणि जावेद अख्तर यांच्यामधील या वादाला २०२० पासून सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. जावेद अख्तर यांनी २०२० मध्ये तक्रारीमध्ये सांगितले आहे आहे की, कंगना रनौत हिने एका टीव्ही मुलाखतीमध्ये त्यांच्याविरुद्ध बदनामीकारक भाष्य केले आहेत, ज्यामुळे त्यांची प्रतिष्ठा खराब झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच जून २०२० मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगना रनौतने एका मुलाखतीच्या दरम्यान जावेद अख्तर यांचे नाव घेतल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Ishan Khattar लाईव्हचा कॅमेरा बंद करायचा विसरला अन् झालं असं काही…

यानंतर कंगना रनौत हिने नंतरकोर्टात जावेद अख्तर यांच्या विरोधामध्ये ‘खंडणी आणि गुन्हेगारी धमकी’ या प्रकरणी उलट तक्रार दाखल करण्यात आली होती. कंगना रनौतने तिच्या तक्रारीमध्ये दावा करण्यात आला होता की, सह-कलाकाराशी तिच्या वादानंतर, जावेद अख्तर यांनी तिला आणि तिच्या बहिणीला चुकीच्या हेतूने आपल्या घरी बोलावले होते आणि नंतर त्यांना धमकावल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. या प्रकरणामध्ये महानगर दंडाधिकारी आरएम शेख यांनी २४ जुलै रोजी जावेद अख्तर यांना समन्स बजावण्यात आला होता. या प्रकरणामध्ये कोर्टाने जावेद अख्तर यांच्यावरील खंडणीचे आरोप फेटाळण्यात आले आहे.

Tags

follow us