Download App

अखेर उत्सुकता संपली! ऋषभ शेट्टीच्या बहुप्रतिक्षित ‘कांतारा: चैप्टर 1 ‘चा दमदार ट्रेलर प्रदर्शित!

Kantara Chapter 1 विषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर आता निर्मात्यांनी या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित केला आहे

  • Written By: Last Updated:

Kantara Chapter 1 trailer release a film of Rishabh Shetty : ही आहे या वर्षाची सर्वात मोठी घोषणा! 2022 मध्ये गाजलेल्या ‘कांतारा’च्या अपार यशानंतर प्रेक्षकांमध्ये ‘कांतारा: चैप्टर 1’ विषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर आता निर्मात्यांनी या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित केला आहे, जो 2025 मधील सर्वात मोठ्या सिनेमॅटिक क्षणांपैकी एक मानला जातो.

हातात गुलाब, अन् पांढरी साडी; तेजस्विनी लोणारीची अदाकारी पाहिलीत का?…

‘कांतारा: चैप्टर 1’ ही होम्बळे फिल्म्सची यावर्षीची सर्वात जास्त प्रतीक्षा केली जाणारी आणि चर्चेत असलेली फिल्म आहे. ही एक भव्य पॅन-इंडिया फिल्म म्हणून ओळखली जात आहे, आणि तिच्या घोषणेनंतरपासूनच ती प्रेक्षकांच्या आणि माध्यमांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. आता या उत्साहात भर घालत निर्मात्यांनी अखेर चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज केला आहे.

गजेंद्र अहिरे यांचा ‘कमल शेंडगे रंगकर्मी पुरस्काराने सन्मान…

ट्रेलरमध्ये निर्मात्यांनी फारसे तपशील उघड न करता, एक गूढतेचा माहोल तयार केला आहे. या प्रीक्वलमधील रहस्यच चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करत आहे – नेमकं काय घडणार आहे आणि या वर्षीच्या सर्वात मोठ्या चित्रपटात काय नवीन पाहायला मिळणार?

Mardani 3 : नवरात्रीच्या मुहूर्तावर ‘मर्दानी 3’ चं नवं पोस्टर प्रदर्शित…

निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक जबरदस्त व्हिडिओ शेअर करत ट्रेलरची अधिकृत घोषणा केली आहे. ‘कांतारा: चैप्टर 1’ ही होम्बळे फिल्म्सची आतापर्यंतची सर्वात महत्त्वाकांक्षी आणि मोठी प्रकल्पांपैकी एक मानली जात आहे. चित्रपटाच्या क्रिएटिव्ह टीममध्ये संगीत दिग्दर्शक बी. अजनीश लोकनाथ, सिनेमॅटोग्राफर अरविंद कश्यप आणि प्रॉडक्शन डिझायनर विनेश बंग्लान यांचा समावेश आहे. या तिघांनी मिळून एक विलक्षण व्हिज्युअल आणि भावनिक अनुभव तयार केला आहे.

https://youtu.be/M2OnifMgvps?si=O3jNkm7zRlRoshgq

ठाणेकर आता मोकळा श्वास घेणार; CM फडणवीसांनी घेतली मेट्रो 4 ची ट्रायल, शिंदेंचं खास कौतूक…

याशिवाय, होम्बळे फिल्म्सने 2022 मधील ब्लॉकबस्टर ‘कांतारा’च्या वारशाला पुढे नेण्यासाठी कोणतीही कसूर ठेवलेली नाही. ‘कांतारा: चैप्टर 1’ साठी त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मदतीने एक भव्य युद्धप्रसंग (वॉर सीक्वेन्स) तयार केला आहे. या सीक्वेन्समध्ये 500 हुन अधिक कुशल फाइटर्स आणि 3000 लोक सहभागी आहेत. हा सीन 25 एकरच्या खडतर भूप्रदेशात, तब्बल 45-50 दिवसांच्या शूटिंगनंतर चित्रित करण्यात आला आहे – ज्यामुळे तो भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात भव्य सीक्वेन्सपैकी एक ठरतो.

नौ सौ चूहे खाकर, बिल्ली हज को चली! मल्लिकार्जून खर्गेंनी सरकारच्या वसुलीचा आकडाच सांगितला

हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी जगभरात कन्नड, हिंदी, तेलुगू, मल्याळम, तमिळ, बंगाली आणि इंग्रजी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे तो केवळ कर्नाटकपुरता न राहता, संपूर्ण भारत आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. ‘कांतारा: चैप्टर 1’सह होम्बळे फिल्म्स भारतीय सिनेमााच्या कक्षा रुंदावत आहे. हा चित्रपट लोककथा, श्रद्धा आणि सिनेमॅटिक कलेचा एक सुंदर संगम आहे — जो प्रेक्षकांना एक आगळा-वेगळा अनुभव देईल.

follow us