SIIMA पुरस्कारांमध्ये होम्बले फिल्म्सच्या ‘कांतारा’चा दमदार जलवा, तब्बल 9 पुरस्कारांवर कोरले नाव

SIIMA Awards : होम्बले फिल्म्सच्या ‘कांतारा’ने साऊथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स (SIIMA) मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट

SIIMA Awards

SIIMA Awards

SIIMA Awards : होम्बले फिल्म्सच्या ‘कांतारा’ने साऊथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स (SIIMA) मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर, सर्वोत्कृष्ट संगीत आणि सर्वोत्कृष्ट गीतलेखन अशा पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. होम्बले फिल्म्स हे निःसंशयपणे भारतातील आघाडीच्या आणि सर्वात मोठ्या प्रॉडक्शन हाऊसेसपैकी एक आहे. या निर्मिती संस्थेने भारतीय सिनेमाच्या विश्वाला एकापेक्षा एक दमदार आणि सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अनेक पुरस्कार आणि सन्मान आपल्या नावावर केल्यानंतर आता होम्बले फिल्म्सने SIIMA पुरस्कारांमध्येही आपली छाप पाडली आहे. विशेष म्हणजे, ‘कांतारा’ या चित्रपटाने एक-दोन नव्हे, तर तब्बल 9 पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत.

दुसरीकडे, होम्बले फिल्म्सचा ‘हनुमान अंश’ हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रदर्शित केला जात आहे, ज्यामुळे ही शानदार कथा जागतिक स्तरावरील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. होम्बले फिल्म्सने देशातील अनेक मोठ्या पॅन-इंडिया चित्रपटांची निर्मिती केली असून, त्यामुळे हे भारतातील आघाडीच्या प्रॉडक्शन हाऊसेसपैकी एक म्हणून ओळखले जाते. KGF फ्रँचायझी, ‘कांतारा’, ‘सालार’ फ्रँचायझी आणि ‘महावतार नरसिम्हा’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपट आणि फ्रँचायझीमागे होम्बले फिल्म्स हे प्रमुख नाव आहे. आपल्या भव्य पॅन-इंडिया चित्रपटांच्या माध्यमातून या प्रॉडक्शन हाऊसने भारतीय सिनेमाच्या विश्वात एक नवा अध्याय लिहिला आहे. त्याचबरोबर बॉक्स ऑफिसवरही मोठे योगदान देणाऱ्या निर्मिती संस्थांपैकी एक म्हणून ते समोर आले आहे.

होम्बले फिल्म्सने ‘महावतार नरसिम्हा’च्या माध्यमातून भारतातील सर्वात मोठ्या आणि उल्लेखनीय अॅनिमेटेड चित्रपटांपैकी एक प्रेक्षकांसमोर आणला आहे. या चित्रपटाने केवळ देशातील अॅनिमेशनचा आवाका मोठा केला नाही, तर त्याला एक नवी ओळखही मिळवून दिली आहे. यासोबतच चित्रपटाने आपल्या सांस्कृतिक मुळांशी असलेली नाळही कायम ठेवली आहे. गेल्या काही वर्षांत या कंपनीने केवळ तेलुगू आणि मल्याळम सिनेमापुरतीच मर्यादा न ठेवता, भारतीय चित्रपटसृष्टीतील इतर भाषांमध्येही आपला विस्तार वाढवला आहे.

आगरकरांची मुख्य निवडकर्ता म्हणून शेवटची बैठक; रोहित शर्मा अन् विराट कोहलीबाबत होणार मोठा निर्णय?

आगामी काळातही होम्बले फिल्म्स आपल्या दमदार चित्रपटांच्या शानदार लाइन-अपसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. या आगामी प्रोजेक्ट्समध्ये ‘सालार: पार्ट 2 – शौर्यांग पर्व’, ‘महावतार परशुराम’, ‘सूर्या 48’, ‘येतो का नाय’ तसेच ऋतिक रोशनसोबत होणारे आगामी कोलॅबोरेशन यांचा समावेश आहे.

Exit mobile version