‘कंतारा : चॅप्टर 1’मध्ये रुक्मिणी वसंतची दमदार एन्ट्री! कणकवतीच्या लुकने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Rukmini Vasant In Role Of Kanakavati : होम्बले फिल्म्सची वर्षातील सर्वात मोठी फिल्म ‘कंतारा : चॅप्टर 1’ (Kantara Chapter 1 ) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अभिनेत्री रुक्मिणी वसंत (Rukmini Vasant) ही ‘कणकवती’ची भूमिका साकारणार असून, तिचा पहिला लुक नुकताच प्रदर्शित करण्यात (Entertainment News) आला आहे.
वरमहालक्ष्मी या शुभ दिवशी होम्बले फिल्म्सने प्रेक्षकांना खास भेट दिली आहे. ‘कंतारा : चॅप्टर 1’ मधील ‘कणकवती’चा दमदार पोस्टर लाँच करून, चित्रपटप्रेमींमध्ये एक नवीन उत्सुकता निर्माण केली आहे. विशेषत: या सिनेमॅटिक युनिव्हर्सशी जोडलेल्या चाहत्यांसाठी हा क्षण अधिक रोमांचक ठरला आहे.
चिंताजनक! एसटीच्या दैनंदिन उत्पन्नातील घट 5 कोटींवर; महसुलाचा आलेख घसरला
या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन स्वतः ऋषभ शेट्टी यांनी केले असून, ते यात मुख्य भूमिकेतही दिसणार आहेत. हा चित्रपट 2022 मधील ब्लॉकबस्टर ‘कंतारा’चा प्रीक्वेल आहे. पहिल्या भागाने आपल्या ठसठशीत कथनशैलीमुळे प्रेक्षक आणि समीक्षकांची मने जिंकली होती. याआधी ऋषभ शेट्टी यांचा पहिला लुक त्यांच्या वाढदिवशी प्रदर्शित झाला होता, ज्याने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगवली होती.
View this post on Instagram
आता रुक्मिणी वसंतच्या ‘कणकवती’ अवताराने या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. भारतीय संस्कृतीच्या पाश्वभूमीवर घडणारी ही नवी, भावस्पर्शी कथा प्रेक्षकांना एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव देण्याचे वचन देते. चित्रपटाचे अप्रतिम छायाचित्रण अरविंद एस. कश्यप यांनी केले असून, हृदयाला भिडणारे संगीत बी. अजनिश लोकनाथ यांचे आहे. निर्मिती विजय किरगंदूर यांनी, होम्बले फिल्म्सच्या बॅनरखाली केली आहे.
महादेवी हत्तिणीचा वाद मिटला ! आक्रमक राजू शेट्टींचे अखेर अंबानींसाठी गोड शब्द
‘कंतारा : चॅप्टर 1’ हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2025 रोजी जगभर प्रदर्शित होणार आहे. कन्नड, तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, बंगाली आणि इंग्रजी अशा सात भाषांमध्ये हा चित्रपट एकाच वेळी रिलीज होईल. जसे आज देशभरात माता लक्ष्मीचे पूजन होत आहे, तसेच भावपूर्ण वातावरणात कणकवतीचा हा पहिला लुक सादर करून, होम्बले फिल्म्सने प्रेक्षकांच्या मनात कायमची छाप सोडणाऱ्या या पात्राची झलक दाखवली आहे.