Download App

Kapil Sharma: कपिल शर्माने थेट आमिर खानचे पाय धरले, आमिरने व्यक्त केली ‘ही’ नाराजी

Kapil Sharma: बॉलीवुड (Bollywood) चित्रपटांच्या लाँच सोहळ्याचे काही क्षण हे लक्षवेधी असतात. अनेक वादग्रस्त विधानं यावेळी मंचावर होतात तर कधी एखाद्या विषयावर परखड मत मांडताना कलाकार दिसतात. यातच नुकत्याच एका पंजाबी चित्रपटाच्या (Punjabi movies) लाँच सोहळ्याला चक्क परफेक्शनिस्ट आमिर खानने (Aamir Khan) हजेरी लावली. यावेळी कपिल शर्मा (Kapil Sharma) देखील मंचावर उपस्थित होता.

कपिल शर्मा आणि आमिर खान या मंचावर एकत्र पाहायला मिळाले. सध्या आमिर खानने करियर ब्रेक घेतलाय. मात्र विविध कार्यक्रमांमध्ये तो पाहुणा म्हणून हजेरी लावताना दिसतोय. आमिरला एखादी व्यक्ती आवडली की तो त्या व्यक्तिचं तोंडभरुन कौतुक करतो. तसच आमिर कपिल शर्माचा देखील चाहता आहे आणि हे त्याने या मंचावर कबुल केलं. यावेळी आमिर म्हटला की, “मी सध्या काम कमी करतोय आणि कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.


कॉमेडी मला प्रचंड आवडते तर दररोज रात्री झोपण्याआधी मी काहीतरी कॉमेडी बघतो. मागील काही महिन्यापासून मी कपिलचा कार्यक्रम बघतोय. आणि मी आता त्याचा मोठा चाहता झालोय. तो आज जेव्हा इथे आला तेव्हा मी आनंदी झालो. माझ्या कित्येक संध्याकाळ कपिलमुळे रंजक झाल्यात. त्याने मला खूप हसवलय. काही आठवड्यापूर्वी मी त्याला फोनही केला आणि मनोरंजन करण्यासाठी त्याचे आभार मानले होते.लोकांना हसवणं हे खरच खूप मोठं काम आहे.

कपिल शर्माचं कौतुक तर आमिरने केलच. पण त्यानंतर नाराजी देखील व्यक्त केली. कपिलने आजकवर आपल्याला त्याच्या द कपिल शर्मा कार्यक्रमात बोलावलं नसल्याची खंत त्याने यावेळी व्यक्त केली. द कपिल शर्मा कार्यक्रम आमिर फॉलो करतो आणि या कार्यक्रमाचा तो चाहता आहे. मात्र या सगळ्यात आमिरने एक खंत व्यक्त केली. तो म्हणतो की, “पण मला तू कधीच तुझ्या कार्यक्रमात बोलावलं नाहीस. हे खूप चूकीचं आहे. माझ्या चित्रपटाच्या रिलीजच्या वेळी तू बोलावतोय. मी रिलीजच्या वेळी नाही येणार मी मनोरंजनासाठी येईल.

Gutami Patil ला तेव्हा दोन वेळचं जेवण द्यायला कुणी गेलं नव्हतं; विरोध करणाऱ्यांचा अमोल कोल्हेंकडून समाचार

आमीरने त्याच्या अंदाजात कपिलच्या कार्यक्रमात जाण्याची इच्छा व्यक्त केली. मग कपिलला देखील रहावलं नाही. कपिलनेही आमिरचे आभार मानले आणि तो पुढे म्हणाला की, “ज्या दिवशी तुम्ही याल तेव्हा आमचं नशीब उजळेल. मी आमिर भाईला गर्दीत वैगेर भेटलोय. अनेकदा त्यांना विनंती देखील केली आहे. मात्र त्यांना बाहेर जायचं होतं आणि ते थेट मग तीन वर्षांनी भेटतात.

कपिल आणि आमिरच्या या संवादाने सगळ्यांचच लक्ष वेधलं. तेव्हा आमिरने इच्छा व्यक्त केल्यानंतर आमिर लवकरच कपिलच्या कार्यक्रमात दिसेल यात शंका नाही. मात्र आमिर द कपिल शर्मा कार्यक्रमाच्या मंचावल आला तर कार्यक्रमाची शोभा वाढेल एवढं नक्की.

Tags

follow us