मद्यधुंद अवस्थेत अमिताभ बच्चन यांना भेटायला गेला कपिल शर्मा, मग बच्चन यांनी….

छोट्या पडद्यावरी कॉमेडी किंग म्हणून कपिल शर्मा (Kapil Sharma) ओळखला जातो. त्याने आपल्या कपिल शर्माच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिकली. कपिल हा सध्या त्याच्या आगामी ‘ज्विगाटो’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कलाकार कोणतीही कसर सोडत नाहीत. याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कपिन शर्माने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. कपिलने एका मुलाखतीत सांगितले की, एक […]

Untitled Design (33)

Untitled Design (33)

छोट्या पडद्यावरी कॉमेडी किंग म्हणून कपिल शर्मा (Kapil Sharma) ओळखला जातो. त्याने आपल्या कपिल शर्माच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिकली. कपिल हा सध्या त्याच्या आगामी ‘ज्विगाटो’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कलाकार कोणतीही कसर सोडत नाहीत. याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कपिन शर्माने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. कपिलने एका मुलाखतीत सांगितले की, एक काळ असा होता की बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी त्याला दारू घ्यावी लागली. मात्र, या प्रकारानंतर त्याने अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची माफीही मागितली.

कपिल शर्मा निराशेच्या वाईट टप्प्यातून बाहेर आला आहे. याची जाणीव त्याच्या चाहत्यांना चाहत्यांना आहेच. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या नुकत्याच मुलाखतीत कपिल शर्माने सांगितले होते की, करिअरमधील एक वाईट काळ असा होता की, मला कोणी भाव देत नव्हतं. कोणी जोक्सवर हसायला तयार नव्हतं. त्यामुळे मी निराशेच्या खाईत ढकलल्या गेला. त्यातून मी दारुच्या आहारी गेलो. हा काळ असा होता की मी कोणालाही भेटण्याची हिंमत करू शकत नव्हतो.

अशाच एका घटनेची आठवण करून देताना कपिल म्हणाला – मला कधीच दारुचं व्यसन नव्हतं. पण त्या काळात मला सार्वजनिक ठिकाणी जायला भीती वाटायची. त्यामुळे त्याने मी दारू पिण्यास सुरुवात केली. कपिलने सांगितलं की, जेव्हा फिरंगी रिलीज होणार होता, तेव्हा अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी दारूच्या नशेत भेटायला गेला होता. सोबत त्याची पत्नी गिन्ना देखील होती. बच्चन हे स्टुडिओत चित्रपटासाठी व्हॉईसओहर करत होते. तो स्टुडिओत गेला होता. सकाळचे आठ वाजले होते. तो आधीच दोन पेग घेऊन आला होता. अमिताभ बच्चन यांनी फिरंगी चित्रपटाा व्हॉईसओव्हर पूर्ण केला होता आणि त्यांच्या चित्रपटासाठी डबिंग करत होते.

शीतल म्हात्रे नेमक्या आहेत तरी कोण? जाणून घ्या

तेव्हा बाहेर उभ्या असलेल्या स्टाफला सांगितलं की, त्याला बिग बींना भेटायचं आहे. मात्र, स्टाफने त्याला अडवले. त्यामुळं कपिल त्याच्याशी भांडू लागला. त्यामुळं स्टाफनं त्याला बिग बींना भेटू दिल. कसंबसं करूप कपिल बिंग बींना भेटायला गेला. त्याने गिन्नीगडे हात दाखवून ही तुमची सुन आहे, असं सांगितलं. मात्र, कपिलला दारूच्या नशेत पाहून बच्चन यांना धक्काच बसला होता.

दुसऱ्या दिवशी कपिलने त्यांना मॅसेज करून सॉरी म्हटले. कपिलने लिहिले की, – सर, माफ करा, मी तुमच्यासमोर असे यायला नको होते. मग त्यांनी हिंदीत खूप छान संदेश कपिलला पाठवला. त्यांनी लिहिलं होतं की, जीवन एक संघर्ष आहे, संघर्ष हे जीवनाचे दुसरे नाव आहे.

कपिलचा झ्विगाटो हा चित्रपट १७ मार्चला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नंदिता दास यांनी केले आहे. या चित्रपटात शहाना गोस्वामी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Exit mobile version