Saif Ali Khan and Kareena Kapoor Star Kid: करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा मोठा मुलगा तैमूर (Taimur) हा सर्वात प्रसिद्ध स्टार किड आहे. लहान वयातच त्याच्याबद्दल अनेक बातम्या प्रसिद्ध केल्या जात असल्याचे पाहायला मिळत. तैमूरने मोठा झाल्यावर हिरो व्हावे असे अनेकांना वाटते, मात्र कपूर कुटुंब आणि पतौडी कुटुंबाप्रमाणे तैमूर अभिनयाच्या क्षेत्रात येणार नाही. त्याचे वेगळे स्वप्न आहे. त्याला स्पोर्ट्स पर्सन बनायचे आहे आणि यासोबतच त्याला संगीतातही रस आहे.
अलीकडेच एका मुलाखतीत सैफ अली खानने आपल्या मुलाच्या स्वप्नाबद्दल थेटच सांगितले आहे. म्हणाला की, तैमूरला मोठा झाल्यावर लीड गिटारिस्ट आणि फुटबॉल प्लेयर व्हायचं आहे. त्याच मुलाखतीत करिनाने देखील सांगितले की, तैमूरला लिओनेल मेस्सी बनायचे आहे. शालेय अभ्यासासोबतच तैमूर कराटेच्या क्लासेसलाही जात असतो. तैमूरचा धाकटा भाऊ जेह देखील पापाराझींचा आवडता आहे. ते अनेकदा कॅमेऱ्यातही कैद झाले आहेत. पूर्वी तैमूर पापाराझींसोबत मिसळायचा आणि आता जेहही या गोष्टीत पारंगत झाला आहे. करीना आणि सैफ अलीची दोन्ही मुले या जोडप्याच्या चाहत्यांना खूप आवडतात.
‘सर्जनशीलतेच्या नावाखाली…’ : अश्लील सीन्सवरुन मंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मला फटकारले
सैफ अली खान आणि करीना कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर सैफ 2023 च्या बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 600 कोटींचा व्यवसाय केला. करीना कपूर हंसल मेहताच्या द बकिंघम मर्डर्समध्ये दिसली होती. याशिवाय करिनाने ‘जाने जान’मधून ओटीटीमध्ये पदार्पण केले आहे.
सैफ अली खान आता ज्युनियर एनटीआरसोबत ‘देवारा’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर, प्रकाश राज आणि श्रीकांत हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. करीना आता ‘द क्रू’मध्ये दिसणार आहे, ज्यात क्रिती सेनन आणि तब्बू यांच्याही भूमिका आहेत. या अभिनेत्रीकडे रोहित शेट्टीचा ‘सिंघम अगेन’ देखील आहे, जो 15 ऑगस्ट 2024 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.