‘चंदू चॅम्पियन’ साठी कार्तिक आर्यनला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ अन् साजिद नाडियादवाला आनंदोत्सव

Sajid Nadiadwala : 'नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट'च्या 'चंदू चॅम्पियन' चित्रपटासाठी कार्तिक आर्यनला 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' म्हणून

Sajid Nadiadwala

Sajid Nadiadwala

Sajid Nadiadwala : ‘नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट’च्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटासाठी कार्तिक आर्यनला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद ‘नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट’कडून साजरा केला जात आहे. हा कार्तिकचा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे आणि ‘छिछोरे’ (ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता) या चित्रपटानंतर या निर्मिती संस्थेसाठी हा आणखी एक अभिमानास्पद टप्पा ठरला आहे.

‘नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट’च्या अधिकृत हँडलवरून खालील संदेश शेअर करण्यात आला. “‘चंदू चॅम्पियन’साठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्याबद्दल कार्तिक आर्यनचे मनापासून अभिनंदन. या चित्रपटासाठी कार्तिकला त्याचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळताना पाहणे, हा ‘नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट’मधील आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. पडद्यावर कार्तिकने साकारलेली भूमिका म्हणजे एक जादूच होती.

मुरलीकांत पेटकर यांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्याने या चित्रपटात आपले सर्वस्व ओतले, हे आम्ही पाहिले आहे. शारीरिक बदल (ट्रान्सफॉर्मेशन), त्याची निष्ठा आणि त्याने सेटवर तसेच पडद्यावर दाखवलेली भावनिक खोली – हे सर्व खरोखरच असाधारण होते. ही सुंदर कथा अत्यंत मनापासून दिग्दर्शित केल्याबद्दल कबीर खान यांचे आणि ही संकल्पना प्रत्यक्षात आणणाऱ्या प्रत्येक तंत्रज्ञाचे खूप खूप आभार. ज्यांनी आमच्या चित्रपटावर प्रेम केले आणि आमच्या ‘चॅम्पियन’च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, त्या सर्वांचे आभार.

Ramayanam : भारतातील सर्वात भव्य सिनेमॅटिक प्रवासाची सुरुवात-

हा विजय आम्ही दीर्घकाळ लक्षात ठेवू आणि त्याचा आनंद साजरा करू. ‘नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट’मध्ये, ज्या कथा सांगणे गरजेचे आहे अशा कथांना पाठिंबा देण्याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि हा सन्मान आमच्या सर्वांसाठी खूप वैयक्तिक आहे. एका चॅम्पियनचा जन्म झाला. एका चॅम्पियनची भूमिका साकारली गेली आणि आता संपूर्ण देश आमच्या ‘चॅम्पियन’चा गौरव करत आहे!”

Exit mobile version