Ramayanam : भारतातील सर्वात भव्य सिनेमॅटिक प्रवासाची सुरुवात

Ramayanam : रामायणम् हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात भव्य आणि महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक आहे. दोन भागांत प्रदर्शित होणाऱ्या या

Ramayanam

Ramayanam : रामायणम् हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात भव्य आणि महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक आहे. दोन भागांत प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात रामायणाची कथा भव्य व्हिज्युअल्स, दमदार कथानक आणि उत्कृष्ट कलाकारांच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर साकारली जाणार आहे. चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच प्रचंड उत्सुकता असून प्रत्येक नव्या अपडेटची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.

भव्य ट्रेलर लॉन्चपूर्वी रामायणम् ची संपूर्ण टीम नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमासाठी एकत्र आली. यावेळी निर्माते नमित मल्होत्रा, दिग्दर्शक नितेश तिवारी, रणबीर कपूर, साई पल्लवी, अरुण गोविल, कुमार विश्वास आणि कुणाल कपूर यांनी एकत्र येत संस्मरणीय ग्रुप फोटो काढला. या कार्यक्रमाला रवी दुबे, रकुल प्रीत सिंग, शोभना आणि अजिंक्य देव यांनीही उपस्थिती लावली. रामायणम् साठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला असून, भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांचा उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे.

रामायणम् च्या माध्यमातून नितेश तिवारी रामायणासारखी अजरामर कथा यापूर्वी कधीही न पाहिलेल्या भव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर सादर करत आहेत. चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीराम यांच्या भूमिकेत, तर साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत. यश रावणाची भूमिका साकारणार असून, सनी देओल हनुमानाच्या आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

खंडणी दे, नाहीतर दुकान चालू देणार नाही; शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुखाला अटक 

नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या रामायणम् ची निर्मिती नमित मल्होत्रा यांच्या प्राइम फोकस स्टुडिओज, ८ वेळा ऑस्कर विजेत्या DNEG आणि यश यांच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. दोन भागांत प्रदर्शित होणारा हा चित्रपट जगभरातील IMAX चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये, तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रदर्शित होईल.

follow us