खंडणी दे, नाहीतर दुकान चालू देणार नाही; शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुखाला अटक

Pooja Bansode : व्यावसायिकाकडून 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणात नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत

Pooja Bansode

Pooja Bansode : व्यावसायिकाकडून 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणात नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत उपमुख्यमंत्री शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख पूजा बनसोडेला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून अनेक चर्चांना उधाण आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा बनसोडे यांनी भंगारचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाला 2 लाख रुपायंची खंडणी मागितली होती मात्र व्यावसायिकाने खंडणी देण्यास नकार दिल्याने पूजा बनसोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यावसायिकाला आणि दुकानात काम करणाऱ्या एका कामगाराला बेदम मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप व्यावसायिकाकडून करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पूजा बनसोडेला अटक केली आहे.

भंगार व्यासायिकाचे दुकान नवी मुंबईतील इंदिरा नगर परिसरात असून या परिसरात दुकान चालावयाचे असेल तर 2 लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल अशी धमकी पूजा बनसोडे (Pooja Bansode) यांनी व्यावसायिकाला दिली होती. मात्र व्यावसायिकाने खंडणी देण्यास नकार दिल्याने पूजा बनसोडेने यांनी त्यांच्या सहकारी रमजान शेख, सरिता सरवदे, नरेंद्र साकवार आणि हुसेन शेख यांच्या मदतीने व्यावसायिक आणि दुकानात काम करणाऱ्या कामगाराला बेदम मारहाण केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड तिसरी वनडे, जसप्रीत बुमराह बाहेर; जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन-

पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत पूजा बनसोडे यांना अटक केली आहे तर गुन्ह्यातील इतर चार आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

follow us