Download App

Vivek Agnihotri: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ट्वीट करत म्हणाले, “राजकीय पक्षांनी माझ्या विरोधात..”

Vivek Agnihotri: दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे त्यांच्या चित्रपटांमुळे आणि सोशल मीडियावरील सततच्या पोस्टमुळे कायम चर्चेत असतात. विविके यांचा ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट गेल्या वर्षी चाहत्यांच्या भेटीस आला. या सिनेमामुळे देखील विवेक हे नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. आता ५ वर्षांअगोदरच्या ट्वीट प्रकरणाविषयी नुकतीच अग्निहोत्री यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले.

५ वर्षांअगोदरच्या ट्वीट प्रकरणाविषयी विवेक अग्निहोत्री यांनी नुकतेच एक नवीन ट्वीट शेअर केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी सांगितले आहे की, ‘दिल्ली उच्च न्यायालयातील सू मोटो क्रिमिनल अटेम्प्ट केसच्या कालच्या घडामोडींवर माझे स्टेटमेंट, काही पक्षपाती प्रसारमाध्यम आणि राजकीय पक्षांनी माझ्या विरोधात ज्या प्रकारे बातम्या दिल्या आहेत, ते पूर्णपणे खोट्या आहेत.

‘या ट्वीटमध्ये त्यांनी दोन फोटोदेखील शेअर केले आहेत. या फोटोत दिल्ली उच्च न्यायालयाच्या अवमान याचिकेविषयीचे त्यांचे स्टेटमेंट लिहिण्यात आले आहे. विवेक अग्निहोत्रींनी ट्वीटवर शेअर केलेल्या ट्वीटमध्ये सांगितले आहे की, ‘५ वर्षांअगोदर अमेरिकास्थित ‘Drishtikone’ने गौतम नवलखा यांच्यावर एक लेख प्रकाशित करण्यात आला होता, ज्यांना भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व धोक्यात आणल्याच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

Akshay Kumar : 55 वर्षीय खिलाडीला शर्टलेस होऊन डान्स करणं पडलं महागात; व्हिडीओ पाहून चाहते भडकले

स्रोत आणि लेखकाचा हवाला देऊन मी फक्त ट्वीट थ्रेड म्हणून लेख पोस्ट केला. यानंतर, दिल्ली उच्च न्यायालयाने Drishtikone, श्री एस. गुरुमूर्ती आणि माझ्यावर काही आरोप लावण्यात आले होते. तो लेख ज्याने लिहिला होता, त्या लेखकाने ताबडतोब माफी मागून तो लेख काढून टाकला. यानंतर श्री एस गुरुमूर्ती यांनी न्यायालयात बिनशर्त माफी मागितली.

यामुळे माझ्याकडे कोणतीही पर्याय राहिली नाही. लेखाच्या स्त्रोतांनीच माफी मागितल्याने मी नैतिक आणि बौद्धिकदृष्ट्या माफी मागितली असल्याची माहिती आहे. विवेक अग्निहोत्री यांनी या ट्वीटमध्ये त्यांच्या आगामी चित्रपटांविषयी देखील माहिती दिली आहे. त्यांचा ‘वॉक्सिन वॉर’ हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Tags

follow us