Download App

Adipurush Nepal: नेपाळमध्ये आदिपुरुषवर बंदी, यापुढे बॉलिवूड सिनेमा प्रदर्शित होणार नाही

Adipurush Nepal: प्रदर्शनाच्या अगोदरच मोठ्या वादात अडकलेला ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमा प्रदर्शित झाल्यावर दिवसेंदिवस नवीन वादाच्या भवऱ्यात  अडकत आहे. सिनेमातील संवाद, कलाकारांचे लूक, व्हीएफएक्स आणि त्यातील दृश्ये अशा बऱ्याच गोष्टी या वादास कारणीभूत ठरत आहेत. अशातच या सिनेमावरून शेजारच्या नेपाळ (Nepal) देशात वाद सुरू झाला आहे.

परिणामी नेपाळने ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी कोणतेही भारतीय सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. रामायणावर आधारित हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून नेपाळमध्ये देखील विरोध होत आहे. इथे सीतेच्या जन्माच्या दाव्यांवरून वाद होत आहे.

याबद्दल काठमांडूचे महापौर बलेन शाह (Mayor Balen Shah) यांनी सोशल मीडियावर (Social media) एक पोस्ट केली होती. हा वाद वाढला असून नेपाळमध्ये ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. फक्त ‘आदिपुरुष’च नव्हे तर कोणताही हिंदी सिनेमा चालवणार नाही, असा निर्णय काठमांडू महापालिकेने यावेळी घेतला आहे.

Ketaki Chitale: केतकी चितळे वादग्रस्त पोस्टमुळे पुन्हा चर्चेत, आता नेमके काय झाले?

नेमका काय वाद ?

‘आदिपुरुष’चे निर्माते सीतेच्या जन्माच्या ठिकाणाची नावाची दुरुस्ती करेपर्यंत हा सिनेमा चालवणार नाही, असे काठमांडूचे महापौर बलेन शाह यांनी ट्वीट केले होते. नेपाळ सरकारच्या मते, सीतेचा जन्म नेपाळच्या तराई प्रदेशातील जनकपूर या गावी झाला होता. तर भारतात सीतेचा जन्म सीतामढी इथे झाला असं सांगितले जातं.

या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये कायमच वाद होत आहेत. दरम्यान नेपाळने सिनेमावर बंदी घातल्यानंतर ‘आदिपुरुष’चे निर्माते याबद्दल कोणता निर्णय घेतात, नेपाळमध्ये इतर भारतीय सिनेमावरील बंदी हटवली जाईल का? हे येत्या काळामध्ये समजणार आहे.

Tags

follow us