आमिर खान प्रोडक्शन्सच्या ‘हॅपी पटेल – खतरनाक जासूस’च्या ट्रेलरवर नेटिझन्सचा कौतुकाचा वर्षाव

आमिर खान प्रोडक्शन्सने अखेर त्यांच्या आगामी हटके जासूसी कॉमेडी चित्रपट 'हॅपी पटेल: खतरनाक जासूस'चा ट्रेलर केला प्रदर्शित.

  • Written By: Published:
Untitled Design   2025 12 20T150310.799

Netizens shower praise on the trailer of ‘Happy Patel – Dangerous Detective’ : एका वेगळ्या आणि मजेशीर घोषणेनंतर आमिर खान प्रोडक्शन्सने(Amir Khan Productuion) अखेर त्यांच्या आगामी हटके जासूसी कॉमेडी चित्रपट ‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका वीर दास(Veer Das) यांनी साकारली असून, त्यांच्यासोबत मोना सिंह(Mona Singh) झळकणार आहेत. चित्रपटात भरपूर हशा आणि मनोरंजनाची मेजवानी असल्याचे ट्रेलरमधून स्पष्ट दिसते. अनेक अनपेक्षित आणि धमाल क्षणांनी भरलेला हा ट्रेलर प्रेक्षकांना खळखळून हसवणारा आहे. ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि चित्रपट चर्चेत आला.

 

 

आमिर खान प्रोडक्शन्स नेहमीच वेगळ्या आणि अनोख्या कथा प्रभावीपणे मांडण्यासाठी ओळखले जाते. लगान, तारे जमीन पर, दंगल आणि सीक्रेट सुपरस्टार यांसारख्या अविस्मरणीय चित्रपटांनंतर हे प्रोडक्शन हाऊस पुन्हा एकदा काहीतरी नवं दाखवण्याच्या तयारीत आहे. यावेळी त्यांची भागीदारी प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन वीर दास यांच्यासोबत झाली आहे. वीर दास यांनी जगभरात आपल्या कॉमेडी स्पेशल्समुळे ओळख मिळवली असून गो गोआ गॉन, बदमाश कंपनी आणि दिल्ली बेली यांसारख्या चित्रपटांतही त्यांनी अभिनय केला आहे. ‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’ हा आमिर खान प्रोडक्शन्ससोबत वीर दास यांचा दुसरा चित्रपट आहे; यापूर्वी त्यांनी दिल्ली बेलीमध्ये एकत्र काम केलं आहे.

पुण्यात ऑपरेशन ‘लोटस’, आमदार पुत्र सुरेंद्र पठारे भाजपवासी, पण का? समजून घ्या राजकारण

आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली तयार झालेला हॅपी पटेल: खतरनाक जासूस हा चित्रपट वीर दास यांनी दिग्दर्शित केला असून, तो 16 जानेवारी 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

follow us