Download App

Tiger 3: कतरिना कैफ अन् भाईजानच्या ‘रुआन’ गाण्याने जिंकली प्रेक्षकांची मन !

Tiger 3 Movie Romantic Song: सिनेमॅटिक विश्वात सध्या चर्चा होतेय ती म्हणजे कतरिना कैफ (Katrina Kaif)आणि सलमान खान (Salman Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका भाईजान यांच्या ‘टायगर 3’ (Tiger 3 Movie) मधील रोमँटिक गाणं ‘रुआन’ (Tiger 3 Song) याची. सलमान खान सोबत तिच्या मंत्रमुग्ध केमिस्ट्रीने केवळ चाहत्यांना मोहितचं केलं नाही तर ती बॉक्स ऑफिसवर तिचे वर्चस्व देखील मजबूत केले आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट ‘टायगर 3’ ने 100 कोटी कमवून बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे.


कतरिना कैफचा बॉलीवूड प्रवास हा कमालीचा आहे, या चित्रपटात स्टंट करण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली. याचे काही व्हिडीओ तिने सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घातले आहेत. कतरिना कैफने इंस्टाग्रामवर काही व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यातील एका व्हिडीओमध्ये वर्कआउट करत असल्याचे बघायला मिळत आहे. दुसऱ्या व्हिडीओत  ती स्टंटची रिहर्सल करताना दिसत आहे.

तिच्या काही व्हिडीओमध्ये देखील कतरिना तिच्या फिटनेसवर मेहनत करत असल्याचे दिसत आहे. मनमोहक अभिनयासाठी आणि जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्ससाठी ओळखली जाणारी ही अभिनेत्री इंडस्ट्रीमध्ये एक अनोखं स्थान निर्माण केलं आहे. “रुआन” या गाण्याच्या रिलीजने टायगर 3 मध्ये अजून एक कमाल गाण्याची भर केली आहे आणि सलमान खान आणि कतरिना कैफ यांची केमेस्ट्री पुन्हा एकदा चाहत्यांनी अनुभवली आहे.

अखेर प्रतीक्षा संपली! रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज

कतरिना कैफ च्या टायगर 3 ने 100 कोटी चा गल्ला जमवत ” रुआन” या गाण्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. मनीष शर्मा दिग्दर्शित आणि कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी सोबत मुख्य भूमिकेत असलेला ‘टायगर 3’ नोव्हेंबर रोजी रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला. आता चाहते विजय सेतुपतीसोबत श्रीराम राघवनच्या ‘मेरी ख्रिसमस’ मध्ये कतरिनाला बघण्यासाठी पुन्हा एकदा उत्सुक झाले आहेत.

Tags

follow us