Tiger 3 Box Office Collection : क्रिकेट विश्वचषकाचा फटका तरीही टायगर 3 ने जमवला 324 कोटींचा गल्ला
Tiger 3 Worldwide Box Office Collection : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या टायगर 3 (Tiger 3) या सिनेमाने दिवाळीत बॉक्स ऑफिसवर धमाकेदार एंट्री केली. 12 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या टायगर 3 ने पहिल्या दिवशी देशभरात 44.5 कोटी रुपयांचे कलेक्शन करून दमदार ओपनिंग केली. आत्तापर्यंत टायगर 3 ने 6 दिवसात भारतात 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे, तर जगभरात 324 कोटींची कमाई केली आहे.
फासावर लटकवलं तरी महाराष्ट्राला झुकू देणार नाही; गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरे आक्रमक
सलमान आणि कतरिनाच्या टायगर 3 या चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. या चित्रपटाने रिलीजच्या सात दिवसांत रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. मनीश शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 44.5 कोटींची ओपनिंग केली. दिवाळीत सहसा अशी कमाई होत नाही. कारण, लोक सण साजरा करण्याच्या मूडमध्ये असतात. मात्र, भाईजानचा चित्रपट म्हटल्यावर चाहते दिवाळीच्या दिवशीही टायगर 3 चित्रपटगृहांमध्ये पाहण्यासाठी गेले होते. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 59.25 कोटींची कमाई केली. मात्र त्यानंतर चित्रपटाच्या कमाईत सातत्याने घसरण होत आहे. सध्या सुरू असलेलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचाही या चित्रपटाला फटका बसला.
टायगर 3 हा चित्रपट बॉलीवूडमधील अनेक नवे रेकॉर्ड मोडेल अशी अपेक्षा होती, पण तसं काही घडलं नाही. चित्रपट वेळेवर प्रदर्शित न होणे हे एक कारण आहे. हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित झाला, त्यामुळे शुक्रवार आणि शनिवार या दोन्ही दिवशी त्याची कमाई कमी झाली. दिवसेंदिवस टायगर 3 ची कमाई सातत्याने कमी होत असून या शुक्रवारी चित्रपटाची केवळ 13.25 कोटी रुपये कमाई झाली.
Maratha Reservation : मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत काय घडलं? संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितलं
असं असलं तरीही टायगर 3ने भारतीय बॉक्स ऑफिसवर 6 दिवसात 200 कोटींचा आकडा गाठला असला तरी जगभरात 324 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आता वीकेंडला हा चित्रपट 400 कोटींचा टप्पा पार करेल अशी आशा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.
टायगर 3 चे बॉक्स ऑफीस कलेक्शन-
रविवार [लक्ष्मीपूजा]
हिंदी – ₹ 43.00 कोटी.
डब केलेले – ₹ 1.50 कोटी.
एकूण – ₹ 44.50 कोटी.
सोमवार [अमावस्या]
हिंदी – ₹ 58.00 कोटी.
डब केलेले – ₹ 1.25 कोटी.
एकूण – ₹ 59.25 कोटी.
मंगळवार
हिंदी – ₹ 43.50 कोटी.
डब केलेले – ₹ 1.25 कोटी.
एकूण – ₹ 44.75 कोटी.
बुधवार [भाऊ बीज]
हिंदी – ₹ 20.50 कोटी.
डब केलेले – ₹ ०.७५ कोटी.
एकूण – ₹ 21.25 कोटी.
गुरुवार
हिंदी – ₹ 18.00 कोटी.
डब केलेले – ₹ 0.50 कोटी.
एकूण – ₹ 18.50 कोटी.
शुक्रवार
हिंदी – ₹ 13.00 कोटी.
डब केलेले – ₹ 0.25 कोटी.
एकूण – ₹ 13.25 कोटी
एकूण
हिंदी – ₹ 196.00 कोटी
डब केलेले – ₹ 5.50 कोटी
एकूण – ₹ 201.50 कोटी
एकूण कमाई –
भारत ₹ 245 कोटी
परदेशात ₹ 79 कोटी
एकूण ₹ 324 कोटी