Download App

कतरिनाच्या ‘मेरी ख्रिसमस’ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात; रिलीजच्या 3 दिवशी केली एवढी कमाई

Merry Christmas Box Office Collection Day 3: चाहते खूप दिवसांपासून कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांच्या मेरी ख्रिसमसच्या (Merry Christmas Movie) चित्रपटाची वाट पाहत होते आणि जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. (Box Office Collection) कतरिना आणि विजयचे सध्या खूप तोंडभरून कौतुक केलंं जात आहे. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट चांगला व्यवसाय करत आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये लक्षणीय वाढ झाली असली तरी तिसऱ्या दिवशी कलेक्शनमध्ये फारशी वाढ झाली नाही.

मेरी ख्रिसमसच्या तिसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. हे बघता असे म्हणता येईल की आठवड्याच्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन आणखी कमी होणार आहे. मेरी ख्रिसमसबद्दल बोलायचे झाले तर ही एका रात्रीची गोष्ट आहे. ज्यामध्ये एक खून होतो. सर्वजणच सध्या या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. कतरिना आणि विजय सेतुपतीची केमिस्ट्री सगळ्यांनाच आवडली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केले आहे, ज्याने कथेला मोहक बनवले आहे.

मेरी ख्रिसमसच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर रविवारी हा चित्रपट फारशी कमाई करू शकला नाही. या चित्रपटाकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा आहेत. Sacknilk च्या सुरुवातीच्या अहवालानुसार, चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 3.75 कोटींचा व्यवसाय केला आहे.

आयरा-नुपूरच्या रिसेप्शनमध्ये CM शिंदेपासून ते सलमानपर्यंत ‘या’ दिग्गजांनी लावली हजेरी, आमिरनं केलं स्वागत

मेरी ख्रिसमसने पहिल्या दिवशी 2.45 कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी 3.45 कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तीन दिवसांचे कलेक्शन समोर आल्यानंतर एकूण कमाई 9.65 कोटी झाली आहे. 20 कोटींच्या क्लबमध्ये या चित्रपटाचा समावेश होण्याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. मेरी ख्रिसमसबद्दल बोलायचे झाले तर कतरिना आणि विजयसोबत संजय कपूर, राधिका आपटे, टिनू आनंद, विनय पाठकर या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत.

follow us