KBC 15 Latest Update: छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’चा 15वा सीझन (KBC 15) आता अंतिम टप्प्याच्या दिशेने प्रवास करत आहे. दरम्यान या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी देखील भाग घेताना दिसतात. नुकतचं प्रसारित झालेला ‘केबीसी 15 ‘चा एपिसोड अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासाठी खूप खास होता.
Shahrukh KHAN @iamsrk little girl Suhana khan on KBC! Such a Cutie..! #SuhanaKhan #ShahRuhKhan #DunkiDrop5 #Dunki #Archies #TheArchers #TheArchiesOnNetflix #Thalaivar170 #Thalapathy68 pic.twitter.com/Hik2bQ4k8F
— Humpty (@MKDJobsNew53) December 12, 2023
या भागामध्ये अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि शाहरुख खानची लेक सुहाना खान या दोघांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्यासोबत ‘द आर्चीज’ चित्रपटाची टीमदेखील होती. तर, शाहरुख खानची (Shah Rukh Khan) मुलगी सुहाना खान (Suhana Khan) देखील हा एपिसोड कधीच विसरू शकणार नाही. नॅशनल टीव्हीवर वडिलांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला सुहानाने चुकीचे उत्तर दिले.
अंतिम फेरीत स्पर्धकांना 90 सेकंदात जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान दिले होते. प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तरासाठी त्याला 10 हजार रुपये देण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांनी चुकीची उत्तरे दिली तरी त्यांना शो सोडावा लागला आहे. या फन राऊंडमध्ये अमिताभ बच्चन यांनी सुहाना खान, झोया अख्तर यांना विचारले की, यापैकी कोणता पुरस्कार शाहरुख खानला आतापर्यंत मिळाला? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी त्याच्याकडे चार पर्याय होते: A. पद्मश्री B. Legion of Honor C. L’Etoile d’Or D. Volpi Cup. ‘ऑप्शन डी वोल्पी कप’ या प्रश्नाचे योग्य उत्तर होते. पण, सुहानाने चुकीचे उत्तर दिले आणि शाहरुख खानला पद्मश्री मिळाले नसल्याचे सांगितले.
Ole Aale Movie: सायली अन् सिद्धार्थच्या मनातले ‘फुलपाखरू’; ‘या’ दिवशी होणार रिलीज
‘केबीसी’चा खेळ खेळणाऱ्या सेलिब्रिटी स्पर्धकांना सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी केवळ 1 तासाचा वेळ दिला जातो. तर, सामान्य स्पर्धकांना दोन तासाचा वेळ दिलेला असतो. एक कोटीच्या प्रश्नापर्यंत पोहोचण्यासाठी किमान दोन तासांचा अवधी हा लागतोच. यामुळेच या खेळात सहभागी होणारे सेलिब्रिटी केवळ 16 ते 25 लाखांच्या प्रश्नांपर्यंतच पोहोचू शकतात. ‘केबीसी 15’च्या या भागातही असंच काहीसं घडलं. हॉटसीटवर बसलेल्या सुहाना आणि झोयाने 25 लाखांच्या प्रश्नाचे उत्तर देताच वेळ संपल्याची घंटा वाजली आणि त्यामुळे त्यांना हा खेळ सोडावा लागला.