KBC 15: 14 वर्षांच्या मयांकने ‘केबीसी’मध्ये जिंकले 1 कोटी रुपये, उत्तरानं सर्वांचं लक्ष वेधलं

KBC 15: 14 वर्षांच्या मयांकने ‘केबीसी’मध्ये जिंकले 1 कोटी रुपये, उत्तरानं सर्वांचं लक्ष वेधलं

Kaun Banega Crorepati 15: ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati 15) या शोमध्ये नुकताच एक 13 वर्षांचा छोटासा मयांक करोडपती ठरला आहे. (KBC 15) या शोच्या इतिहासातील हा सर्वांत कमी वयाचा स्पर्धक असल्याची माहिती समोर आली आहे. (Amitabh Bachchan) ज्याने एक कोटी रुपये जिंकले आहे. या लहान मुलाचं नाव मयांक आहे. आणि तो मूळचा हरयाणाचा आहे. मयांकने केबीसीमध्ये 1 कोटी रुपये जिंकले आहेत.


स्पेशल केबीसी ज्युनियर वीकच्या दरम्यान मयांकने स्पर्धक म्हणून सहभाग नोंदवला होता. हरयाणाच्या महेंद्रगड येथील मयांकने मंगळवारच्या एपिसोडमध्ये भाग घेतला होता. आठवीमध्ये शिकणाऱ्या मयांकचं ज्ञान पाहून सर्वानाच मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे त्याने 3.2 लाख रुपयांपर्यंत एकसुद्धा लाइफलाइन वापरली नव्हती. आणि नंतर थेट 12.5 लाख रुपयांच्या सवालासाठी त्याने पहिल्यांदा लाइफलाइनचा उपयोग केल्याचे बघायला मिळाले आहे.

1 कोटी रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर मयांकच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाल्याचे बघायला मिळाले. ‘नव्याने सापडलेल्या खंडाला अमेरिका हे नाव असलेला नकाशा तयार करण्याचं श्रेय कोणत्या युरोपियन कार्टोग्राफरला जातं’, असा सवाल त्याला 1 कोटी रुपयांसाठी विचारण्यात आला होता. आणि या प्रश्नसाठी त्याला चार पर्याय देण्यात आले होते.

A- अब्राहम ओर्टेलियस

B- गेराडस मर्केटर

C- जियोवानी बॅटिस्टा अग्निसी आणि

D- मार्टिन वाल्डसिम्युलर असे हे पर्याय देण्यात आले होते. या प्रश्नाचं योग्य उत्तर मार्टिन वाल्डसिम्युलर असं होतं. मयांकने हे योग्य उत्तर देऊन 1 कोटी रुपये आपला हात मारला आहे. त्यानंतर त्याला 7 कोटी रुपयांसाठीचा प्रश्न विचारण्यात आला होता. परंतु त्याचं योग्य उत्तर माहीत नाही, त्यामुळे खेळ सोडण्याचा निर्णय हाती घेतला.

Sara Tendulkar: सारा तेंडुलकर पास झाली! लंडनमध्ये ‘या’ विषयात पूर्ण केलं मास्टर्स

1 कोटी रुपये जिंकल्यावर मयांकचं हरयाणाची मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी देखील त्याच अभिनंदन केलं आहे. या विजयाबद्दल बोलत असताना मयांक म्हणाला की, “सर्वांत कमी वयाचा स्पर्धक म्हणून केबीसीमध्ये मोठी रक्कम जिंकणं ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी अत्यंत स्वाभिमानाची बाब आहे. माझ्या पालकांच नेहमी मला मार्गदर्शन मिळालं आहे, त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानतो. त्याचप्रमाणे या संपूर्ण खेळाच्या दरम्यान मला बिग बीं सरांनी कायम प्रोत्साहन देत होते, त्यामुळे मी त्यांच देखील आभार मानतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube